AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी; सनी-बॉबी देओलच्या निर्णयाचं होतंय कौतुक

धर्मेंद्र यांच्या नव्वदाव्या जन्मदिनी त्यांच्या चाहत्यांसाठी जुहू इथल्या निवासस्थानाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. सनी आणि बॉबी देओल हे स्वत: चाहत्यांचं तिथे स्वागत करत आहेत. जुहू इथल्या बंगल्याबाहेर धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे.

धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी; सनी-बॉबी देओलच्या निर्णयाचं होतंय कौतुक
धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसोबत सनी आणि बॉबी देओलImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 08, 2025 | 7:24 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज (8 डिसेंबर) 90 वा जन्मदिन आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचं मुंबईतल्या जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना देण्यात आली नव्हती, किंवा त्यांची अंत्ययात्राही काढण्यात आली नव्हती. त्यामुळे सनी आणि बॉबी देओल या त्यांच्या दोन्ही मुलांवर अनेकांकडून टीका झाली. परंतु आता वडिलांच्या जन्मदिनी त्यांनी चाहत्यांसाठी जुहू इथल्या घराचे दरवाजे खुले केले आहेत. खुद्द सनी आणि बॉबी देओल चाहत्यांचं हात जोडून स्वागत करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. धर्मेंद्र यांच्या जुहू इथल्या बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळतेय. धर्मेंद्र यांच्या 90 व्या जन्मदिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहते जुहूमध्ये पोहोचले आहेत.

धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यानंतर सनी – बॉबी देओल यांच्याकडून एक आणि हेमा मालिनी यांच्याकडून दुसऱ्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराबद्दल असंख्य चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा काढायला हवी होती, चाहत्यांना त्यांना अखेरचं पाहण्याची संधी मिळायला पाहिजे होती, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. अखेर आज त्यांच्या चाहत्यांसाठी जुहू इथल्या घराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.

धर्मेद्र यांच्या अंत्यविधीबद्दल अभिनेता सलमान खानने ‘बिग बॉस 19’च्या ग्रँड फिनालेमध्ये मत व्यक्त केलं होतं. “दोन जणांचा अंत्यविधी आणि शोकसभा अत्यंत व्यवस्थितप्रकारे पार पाडण्यात आलं होतं. एक दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आईच्या निधनानंतर आणि दुसरं धर्मेंद्र यांच्या निधनानंतर. कुटुंबीयांनी अत्यंत आदरपूर्वक सर्व नियोजन केलं होतं. अर्थात सर्वजण रडत होते, परंतु एक जो आदर आणि जी सभ्यता असायला हवी, आयुष्याचं सेलिब्रेशन जसं असायला हवं.. ते इथे होतं. यासाठी मी सनी, बॉबी आणि सर्व कुटुंबीयांना सलाम करतो. प्रत्येक अंत्यसंस्कार आणि शोकसभा अशाच पद्धतीने पार पडायला हवेत,” असं तो म्हणाला होता.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.