AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

58 वर्षांपूर्वी धर्मेंद्र बनले होते ‘धुरंधर’; ब्लॉकबस्टर ठरलेला हा स्पाय थ्रिलर

2025 आणि 2026 मध्ये 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पहायला मिळाला. 58 वर्षांपूर्वीही असाचा एक स्पाय थ्रिलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

58 वर्षांपूर्वी धर्मेंद्र बनले होते 'धुरंधर'; ब्लॉकबस्टर ठरलेला हा स्पाय थ्रिलर
Dharmendra Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 12, 2026 | 3:05 PM
Share

सध्याच्या घडीला दोन चित्रपटांची जोरदार चर्चा होत आहे. त्यापैकी एक रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ आणि दुसरा रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट आहे. रणवीरच्या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे, तर बिग बजेट ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यादरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक असे दिग्दर्शक चर्चेत आले आहेत, ज्यांनी या दोन वेगवेगळ्या जॉनरमध्ये म्हणजेच स्पाय थ्रिलर आणि धार्मिक महाकाव्य यांमध्ये आपली विशेष छाप सोडली आहे. हे तेच दिग्दर्शक आहेत, ज्यांनी भारताला पहिला बिग बजेट स्पाय ब्लॉकबस्टर दिला. त्याचसोबत ‘रामायण’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. त्यांचं नाव आहे चंद्रमौली चोप्रा. हे नाव कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण त्यांनी आपलं नाव बदलून जे ठेवलं, ते सर्वांच्याच परिचयाचं आहे. चंद्रमौली चोप्रा हेच रामानंद सागर आहेत.

रामानंद सागर यांनी 1980 च्या दशकात टेलिव्हिजनवरील सर्वांत मोठा शो ‘रामायण’ बनवला होता. परंतु देवदेवतांना छोट्या पडद्यावर आणण्याच्या खूप आधी त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला सर्वोत्तम स्पाय थ्रिलर दिला होता. या चित्रपटाचं नाव आहे ‘आँखे’. यामध्ये अभिनेते धर्मेंद्र यांनी मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे 1968 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याच वर्षी गुप्तचर संस्था ‘रॉ’ची (RAW) स्थापना झाली होती. आताच्या ‘धुरंधर’प्रमाणेच ‘आँखे’ हा त्या वर्षातील सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. हा चित्रपट इतका जबरदस्त हिट होता, की त्याने ‘डायमंड ज्युबली’चा विक्रम रचला.

जवळपास तीन तासांच्या या चित्रपटाचं शूटिंग भारत, जपान आणि लेबनन याठिकाणी झाली होती. यामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत माला सिन्हा आणि महमूद यांच्याही मुख्य भूमिका होत्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच आसाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्यांवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू होतो तर मोठ्या संख्येने लोक जखमी होतात. सरकारशी संलग्न नसलेल्या काही जागरुक नागरिकांचा एक गट हे सर्व थांबवण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेतो. सलीम आधीपासूनच बैरुतमध्ये काम करत असतो, पण त्याची ओळख उघड होते आणि त्याला गोळ्या घालून ठार केलं जातं. तेव्हा सुनील मेहराला (धर्मेंद्र) बैरुतला जाऊन त्याची जागा घ्यावी लागते.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?