AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : ते 3 प्रश्न आणि रातोरात बनला दाऊद इब्राहिम… दानिश इक्बालचा थक्क करणारा प्रवास

'धुरंधर 2' चा सध्या सगळीकडे बोलबाल आहे. या चित्रपटात बडे साहब अर्थात दाऊद इब्राहिमची भूमिका करणारा अभिनेता दानिश इकबाल हा रातोरात प्रसिद्ध झालाय. 1600 कोटींचा गल्ला कमावणाऱ्या या चित्रपटात दाऊदचा रोल मिळाला तरी कसा, याचा खास किस्सा दानिशने सांगितला आहे.

Dhurandhar 2 : ते 3 प्रश्न आणि रातोरात बनला दाऊद इब्राहिम...  दानिश इक्बालचा थक्क करणारा प्रवास
धुरंधर मध्ये दाऊदची भूमिका कशी मिळाली ?Image Credit source: social media
| Updated on: Apr 07, 2026 | 10:08 AM
Share

आदित्य धरच्या ‘धुरंधर: द रिवेंज’ अर्थात धुरंधर 2 ने (Dhurandhar 2 )सध्या जगभरात धूमाकूळ माजवला आहे. 1600 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचं सर्वांच्या तोंडी नाव आहे, सगळीकडे त्याबद्दलचं बोललं जातंय. पण चित्रपटाच्या या यशादरम्यान, त्यात छोट्या-मोठ्या भूमिकांमधूनही आपला ठसा उमटवून जाणाऱ्या कलाकारांची बरीच चर्चा होत्ये. विशेषत: दाऊद इब्राहिमची, ही भूमिका अभिनेता दानिश इकबालने बखुबीने वठवली आहे. अवघ्या काही मिनिटांचा त्याचा सीन आहे चित्रपटात, पण त्यातही त्याने आपली अशी छाप सोडल्ये, की प्रेक्षक त्याच्यावरून नजर हटवूच शकत नाहीत. धुरंधर 2 मधील दाऊदच्या या भूमिकेने दानिश इकबाल याला रातोरात प्रसिद्धी मिळाली असून त्याचं काम खूप नावाजलं जातंय. स्क्रीन स्पेस कमी असली तरी त्याचं अभिनयाचं नाणं असं खणखणीत वाजलंय की सर्वांचं लक्ष त्याने वेधून घेतलंय. पण दाऊदचा हा अतिशय चॅलेंजिंग रोल त्याला कसा मिळाला हे तुम्हाला माहीत आहे का ?

‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये ‘बडे साहेब’ची भूमिका साकारल्यानंतर दानिश इक्बाल चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्व स्तरांतून कौतुक होतंय, पण या भूमिकेसाठी त्याला ज्या पद्धीतने अप्रोच करण्यात आलं, ज्या पद्धतीने त्याच्याशी संपर्क साधण्यात आला, ती पद्धत मात्र खूपच अनोखी होती. खुद्द दानिशनचे त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून ही गोष्ट सांगत दाऊदचा रोल कसा मिळाला ते नमूद केलंय.

ते 3 प्रश्न आणि…

धुरंधरमधील भूमिका कशी मिळाली याबद्दल दानिशने खुलेपणाने सांगितलं. तो म्हणाला, ” तुझी उंची, तुझं वय आणि वजन किती आहे ?” असे तीन प्रश्न विचारणारा एक मेसेज मला आला. मला कळेचना की हे कास्टिंग करतायत की मजा ? पण तरीही मी त्या प्रश्नांची उत्तरं, माझ्याबद्दलची माहिती त्यांना पाठवली. तेव्हा मला सांगण्यात आलं की ही (माहिती) भूमिकेची गरज आहे. त्यानंतर मला कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राचा फोना आला, असा-असा दाऊदचा रोल आहे, असं त्याने मला सांगितलं. पण तेव्हाही त्यांनी पूर्ण नाव घेतलं नव्हतं, सो मला वाटलं की फक्त एखाद्या भूमिकेचं नावं असावं, असा किस्सा दानिशने सांगितला.

अनेक तासांचा मेकअप आणि मेहनत

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी उत्कंठा टिकवून ठेवण्यासाठी निर्मात्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, कारण ही छोटी पात्रंच चित्रपटात रंग भरतील याचा त्यांना विश्वास होता आणि नेमकं तसंच घडलं. यापूर्वी, दानिश इक्बालने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘बडे साहेब’च्या भूमिकेसाठी त्याला मेकअप करून घेण्यासाठी तासनतास बसावे लागलं होतं.

तो म्हणाला, “माझी शिफ्ट जर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत असेल, तर मी पहाटे 3 वाजेपर्यंत सेटवर असायचो. पाच ते सहा लोक माझ्या मेकअपवर काम करायचे आणि त्यासाठी सुमारे नऊ तास लागायचे. प्रोस्थेटिक बसवण्याची प्रक्रिया जितकी दमवणारी होती, तितकीच ती त्रासदायकही होती. मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. त्या प्रक्रियेनंतर, मी काहीही खाऊ- पिऊ शकत नव्हतो. मला खूप घाम यायचा आणि गुदमरल्यासारखं वाटायचे. मी दिवसभर फक्त द्रव पदार्थांवरच अवलंबून होतो. फक्त थोडासा ज्यूस आणि एनर्जीसाठी कधी थोडं डार्क चॉकलेट खायचो” असा अनुभवही त्याने कथन केला.

Follow Us
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई