
बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या धुरंधर या चित्रपटाचा सिक्वल आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातील अक्षय खन्ना, संजय दत्त, रणवीर सिंग यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर आज 18 मार्च रोजी आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचा ‘धुरंधर २’ हा प्रदर्शित झाला आहे. १८ मार्चपासून चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यूज सुरू आहेत. १९ मार्चपासून चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत आणि चित्रपटाची क्रेझी अॅडव्हान्स बुकिंगवरुन दिसत आहे. दुसऱ्या भागात नेमकी कथा काय असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचदरम्यान चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे.
कोणत्या दिग्दर्शकाने सांगितला रिव्ह्यू?
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर २’ पाहिला आहे आणि त्यांनी चित्रपटाचा रिव्ह्यू सांगितला आहे. राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाची खूपच प्रशंसा केली आणि आदित्य धर यांना महान दिग्दर्शक म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, हे नवीन सिनेमाई युगाचा जन्म आहे. तसेच त्यंनी चित्रपटाच नेमकं काय आहे याविषयी देखील सांगितले आहे.
कसा ‘धुरंधर २’ चित्रपट?
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर ‘धुरंधर २’ चित्रपटाविषयी लिहिले आहे. ‘मी काल रात्री धुरंधर २ पाहिला. चित्रपटाच्या प्रत्येक पैलूत, मग ते चित्रपटाचे कलेक्शन असो, चाहत्यांचा उत्साह असो, सोशल इन्फ्लुएन्स असो, सिनेमाई व्याकरण तोडणारे असो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा सायकोलॉजिकल ऑडिओ-व्हिज्युअल प्रभाव असो, एकूणच त्याचा प्रभाव ‘शोले’ पेक्षा १०० पट जास्त शानदार असेल. आतापर्यंत बनलेल्या सर्व महान चित्रपटांपासून – मुगल-ए-आझम ते पुढे जे काही बनले, ते या चित्रपटासमोर फक्त टीव्ही मालिकेसारखे वाटतील.’
पुढे राम गोपाल वर्मा यांनी लिहिले, ‘हा एका नवीन सिनेमाई युगाचा जन्म आहे. तसेच सिनेमाच्या जुन्या जगात ज्या गोष्टी अस्तित्वात होत्या त्यांच्या समाप्तीची सुरुवात आहे. दिग्दर्शक हा शब्द आदित्य धर यांच्या नावाने सुरू होईल. स्टीवन स्पीलबर्ग आणि क्रिस्टोफर नोलन सारख्या दिग्गज फिल्ममेकर्सनाही हे समजेल की, ते सर्व काही सोडून धुरंधर २ चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला हवा.’
राम गोपाल वर्मा यांनी रिव्ह्यू पोस्ट केल्यानंतर चाहते आणखी जास्त उत्साहित झाले आहेत. काही शहरांमध्ये चित्रपटाचे शो २४ तास चालतील. या चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन आणि अर्जुन रामपाल सारखे स्टार्स आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये आलेल्या धुरंधरचा सीक्वल आहे.