Dhurandhar 2: हमजा ते मेजर इक्बाल.. ‘धुरंधर 2’ मधील भूमिका किती काल्पनिक अन् किती खऱ्या?

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला आहे, सिनेमाची कथा सत्य घडनेवर आधारित आहे. सिनेमातील अनेक भूमिका सत्य आहेत, तर अनेक भूमिका काल्पनिक आहेत. या भूमिकांमध्ये मेजर इक्बाल पासून रेहमान डकैतपर्यंत सगळे आहे... तर जाणून घ्या कोणत्या भूमिका काल्पनिक आहेत आणि कोणत्या भूमिका खऱ्या आहेत.

Dhurandhar 2: हमजा ते मेजर इक्बाल.. धुरंधर 2 मधील भूमिका किती काल्पनिक अन् किती खऱ्या?
Dhurandhar 2
| Updated on: Mar 20, 2026 | 9:30 AM

ॲक्शन, सस्पेंस आणि एका लव्हस्टोरी भोवती फिरणारा ‘धुरंधर 2’ सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. आता दुसरा भाग म्हणजे ‘धुरंधर 2’ देखील बॉक्स ऑफिस पहिल्याच दिवशी मोठी कमाई करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमाची कथा सत्या घटनेवर आधारित काल्पनीक कथे भोवती फिरते… आता सिनेमातील किती भूमिका काल्पनिक आहेत आणि किती भूमीका खऱ्या याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

हमजा अली मजारी : सिनेमातील सर्वाच महत्त्वाची भूमिका म्हणजे हमजा असी मजारी उर्फ जसकीरत सिंह रांगी (रणवीर सिंग) ही एका काल्पनिक भूमिका आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी या भूमिकेला जन्म दिला आहे… ज्यामुळे सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. हमजा याच्या भावना सिनेमाला एक वेगळा टच देत आहेत.

रेहमान डकैत: सिनेमात रेहमान डकैत ही भूमिका अभिनेता अक्षय खन्ना याने साकारली असून चाहत्यांनी अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेला डोक्यावर घेतलं. अक्षय याने रेहमान डकैतच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. रेहमान डकैत कोणती काल्पनित भूमिका नाहीतर, सत्य घटनेवर आधारित आहे… रेहमान डकैत याने पाकिस्तान पीपल्स अमन कमिटीची स्थापना केलेली.. 2009 मध्ये रेहमान यानं निधन झालं..

मेजर इक्बाल : अभिनेता अर्जुन रामपाल याने सिनेमात मेजर इक्बाल भूमिका साकारली आहे. ही भूमिका कोणती कल्पना नाही तर, दोन खऱ्या व्यक्तींच्या आयुष्याचं मिश्रण आहे. रणवीर इलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये एका ज्येष्ठ जर्नलिस्टने सांगितल्यानुसार, मेजर इक्बाल 26/11 चा ब्रेनचाइल्ड होता आणि दहशतवाद्यांचा हँडलर देखील होता … अर्जुन याने साकारलेली भूमिका मेजर इक्बाल आणि पाकिस्तानी दशतवादी इलियात कश्मिरी यांचं मिश्रण आहे.

जमील जमाली : राकेश बेदी यांनी पाकिस्तानी नेता जमील जमाली याची भूमिका साकारली आहे. ही भूमिका खरी आहे. पण ‘धुरंधर 2’ सिनेमात जमील जमाली याच्यामुळे जो ट्विस्ट येतो तो खरा नाही…

अलीना : सिनेमात अभिनेत्री सारा अर्जुन हिने अलीना भूमिकेला न्याय दिलेला आहे. अलीना जमील जमाली याची मुलगी होती. ही भूमिका पूर्णपणे फिक्शनल आहे. सिनेमाला सॉफ्ट लव्हस्टोरीचा टच देण्यासाठी अलीना आणि हमजा यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

अरशद पप्पू आणि उजैर बलोच : सिनेमात अश्विन धर अरशद पप्पू भूमिकेत दिसत आगे. तर दानिश पंडोर सिनेमा उजैर बलोचच्या भूमिकेत दिसत आहे. दोन्ही भूमिका सत्य घटनेवर आधारित आहेत. रेहमान डकैत याच्यानंतर उजैल बलोच याच्याकडे ल्यारीची सत्ता येते… तर अरशद पप्पू उजैर बलोच याच्या गँगचा मुख्य होतो…

बडे साहब : सिनेमातील बडे साहब दुसरा तिसरा कोणी नाही तर, दाऊद इब्राहिम याला दाखवण्यात आलं आहे. सिनेमात बडे साहब ही भूमिका दानिश इक्बाल याने साकारली आहे. सिनेमातील बडे साहब भूमिका सत्य घटनेवर आधारित आहे.

Follow Us