Dhurandhar Aditya Dhar : 280 कोटींच्या ‘धुरंधर’ चा दिग्दर्शक आदित्य धर किती श्रीमंत ? नेटवर्थ ऐकून..

Aditya Dhar Net Worth : "धुरंधर"चा सगळीकडे बोलबाला आहे. या चित्रपटातील कलाकारांव्यतिरिक्त, पिक्चरचा दिग्दर्शक आदित्य धर यांचही लोकं भरभरून कौतुक करत आहेत. त्याच्या कलात्मकतेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. "धुरंधर" सारखा शानदार चित्रपट बनवणाऱ्या आदित्य धर याच्याकडे किती संपत्ती आहे ?

Dhurandhar Aditya Dhar : 280 कोटींच्या ‘धुरंधर’ चा दिग्दर्शक आदित्य धर किती श्रीमंत ? नेटवर्थ ऐकून..
आदित्य धरची संपत्ती किती ?
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Dec 17, 2025 | 12:14 PM

Aditya Dhar Net Worth : रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना याचा ‘धुरंधर’ (Dhurandhar) हा चित्रपट 2025 या वर्षातला मोठा चित्रपट तर बनला आहेच, पण बॉलिवूडच्या इतिहासामधीलही तो सर्वात मोठा पिक्चर ठरण्याच्या वाटेवर आहे. हा चित्रपट दररोज प्रचंड नफा कमवत आहे असून बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवला आहे. रणवीर सिंग (Ranvweer Singh) , आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि अक्षय खन्ना अशी चित्रपटाची तगडी स्टारकास्ट असून सर्वांचं भरभरून कौतुक होत आहे, पण त्याचसोबत या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरवरही (Aditya Dhar) लोकं खुश आहेत. त्याच्या दिग्दर्शनाने केवळ चाहतेच नव्हे तर सेलिब्रिटींनाही मोहित केले आहे.

यापूर्वी आदित्य धर याचा “उरी: द सर्जिकल स्ट्राईक” हा चित्रपटही प्रचंड गाजला आणि त्याला खूप ओळख मिळाली. विकी कौशलची त्यात प्रमुख भूमिका होती. तर आता धुरंधरमुळे आदित्य पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 280 कोटींच्या बजेटमध्ये हा पिक्चर बनला असून बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डतोड कमाई करत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर प्रत्येक चित्रपटातून तो किती कोटी कमावतो आणि त्याचं नेटवर्थ किती आहे, माहीत आहे का ?

आदित्य धरची फी

आदित्य धर हा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेच, पण तो बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमचा पती आहे. 2021 मध्ये या जोडप्याचे लग्न पार पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य प्रत्येक चित्रपटासाठी आठ ते दहा कोटी रुपये फी घेतो.

किती श्रीमंत आहे धुरंधरचा दिग्दर्शक ?

42 वर्षीय आदित्य धर याचा जन्म 12 मार्च 1983 साली नवी दिल्ली येथे झाला. आदित्य याची लेखक आणि निर्माता म्हणूनही ओळख आहे. 2019 साली विकी कौशल अभिनीत “उरी: द सर्जिकल स्ट्राईक” या चित्रपटाद्वारे आदित्यने प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. द टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, यामी गौतम आणि आदित्य यांची एकत्रित संपत्ती 99 ते 104 कोटींच्या दरम्यान आहे. आदित्य याची निर्मिती, रॉयल्टी आणि प्रॉफिट-शेअरिंगमधूनहीकमाई होते. मुंबई व्यतिरिक्त, आदित्य आणि यामीची चंदीगड आणि हिमाचल प्रदेशातही कोट्यवधींची मालमत्ता आहे.

‘धुरंधर’चा गल्ला किती ?

280 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला ‘धुरंधर’ 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. 28 कोटी रुपयांनी ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने 11 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 380 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट 12 व्या दिवशी 400 कोटींचा चित्रपट बनण्याच्या तयारीत आहे आणि त्याचे जगभरातील कलेक्शनही 600 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.