AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : सिनेमातील हमझा – आलम यांच्या मास्टर प्लानचं ठिकाण, पर्यटकांसाठी झालाय सेल्फी पॉइंट, जाणून घ्या कोणती आहे ‘ती’ जागा?

Dhurandhar : 'धुरंधल' सिनेमात ज्या ठिकाणी हमझा आणि आलम यांच्यात मास्टर प्लान बनायचे, ते ठिकाण आता पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट बनलं आहे. तर जाणून घ्या कोणती आहे ती जागा आणि एकदा नक्की भेट द्या...

Dhurandhar : सिनेमातील हमझा - आलम यांच्या मास्टर प्लानचं ठिकाण, पर्यटकांसाठी झालाय सेल्फी पॉइंट, जाणून घ्या कोणती आहे 'ती' जागा?
Ranveer Singh
| Updated on: Sep 26, 2026 | 8:34 AM
Share

Dhurandhar : ‘धुरंधर’ सिनेमाबद्दल फार काही वेगळं सांगायची गरज नाही. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. फक्त भारतातच नाही तर जगभरात सिनेमाने मोठी मजल मारली. आता देखील सिनेमाचे काही सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामधील एक सीन म्हणजे, ज्याठिकाणी हमझा आणि आलम यांच्याच सिक्रेट प्लान तयार व्हायचे. आमल यांच्या सरबत दुकान हे तयार करण्यात आलं नव्हतं तर, लेह, लडाखमधील असेच एक कॅफे आता या सिमेमाच्या चाहत्यांसाठी एक प्रमुख आकर्षण बनलं आहे. पडद्यावर हे ठिकाण ‘वश्मा बट’ (Vashma Butt) नावाचं चहा आणि बिर्याणीचं दुकान म्हणून दाखवण्यात आलं होतं. सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर, लोक याला ‘धुरंधर कॅफे’ (Dhurandhar Café) या नावानेही ओळखू लागले आहेत.

लेह मार्केटमध्ये ‘धुरंधर कॅफे…’

हे कॅफे मार्केट लेह मार्केट येथील मॉल रोड येथे स्थित आहे. सिनेमाच्या शुटिंगपूर्वी या कॅफेचं नाव एसएच खास रेस्टोरेंट असं होतं… ‘धुरंधर’ सिनेमाच्या दिग्दर्शकांनी कथेनुसार कॅफेचं नाव ‘वाश्मा बट’ याचं दुकान असं नाव दिलं. सिनेमात रणवीर सिंग म्हणजे हमझा आणि गौरव गेरा म्हणजे आलम यांनी याच जागेवर अनेक योजना तयार केल्या. पडद्यावर आल्यानंतर अनेकांनी ओळखलं की, ही जागा लेह याठिकाणी आहे. आता सोशल मीडियावर या जागेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सिनेमानंतर नाही बदलला कॅफेया लूक…

सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर, कॅफेचे मालक सोहेल अली यांनी पडद्यावर दिसलेली कॅफेची ओळख तशीच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून तिथे येणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. चित्रीकरणादरम्यान स्थानिक लोक कलाकारांना पाहण्यासाठी तिथे गर्दी करायचे, परंतु आता देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत. कॅफेच्या आत सिनेमाशी संबंधित अनेक गोष्टी पाहायला मिळतात; तसेच, तिथल्या हिरव्या रंगाच्या भिंतीही जशाच्या तशा जपून ठेवण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर, कॅफेमध्ये रणबीर सिंह आणि गौरव गेरा यांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत.

50 रुपयांत काढता येतील फोटो…

‘धुरंधर कॅफे’ ची आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे येथे येणारे पर्यटक काही ऑर्डर न करता देखील फोटो किंवा व्हिडीओ काढू शकतात. जे पर्यटक कॅफेमध्ये येतात ते फक्त 50 रुपयांमध्ये फोटो किंवा व्हिडीओ काढू शकतात. चाहत्यांसाठी हा अनुभव अधिक खास बनवण्यासाठी, कॅफेमध्ये ‘हमझा’ आणि ‘आलम’ या भूमिकांवर आधारित कपडे आणि विग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यटक या गोष्टींचा वापर करून त्या पात्रांचा लूक साकारू शकतात आणि ते क्षण व्हिडिओ किंवा फोटोंमध्ये टिपू शकतात.

Follow Us
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच