‘धुरंधर’मधल्या ‘जमील जमाली’चा नोरा फतेहीसोबत डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

'धुरंधर' आणि 'धुरंधर 2'मध्ये जमील जमालीची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांचा एक म्युझिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते नोरा फतेहीसोबत डान्स करताना दिसत आहेत.

धुरंधरमधल्या जमील जमालीचा नोरा फतेहीसोबत डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
राकेश बेदी, नोरा फतेही
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2026 | 1:38 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांमध्ये जमील जमालीची भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. या दमदार भूमिकेनंतर आता राकेश बेदी यांनी थेट डान्सच्या विश्वात पाऊल ठेवत सर्वांनाच चकीत केलं आहे. डान्सिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोरा फतेहीसोबत त्यांनी एका खास गाण्यात काम केलं आहे. प्रसिद्ध गायिका शिल्पा रावच्या आवाजातील हे धमाकेदार गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘या बाबा’ असं या नवीन गाण्याचं नाव असून रिलीज होताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नोरा फतेही आणि राकेश बेदी यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. ‘धुरंधर’ फेम राकेश बेदी यांनी त्यांच्या खास अंदाजाने या व्हिडीओला चार चांद लावले आहेत. ‘या बाबा’ या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे अरबी इन्फ्लुएन्स आणि त्याचे हाय-एनर्जी बीट्स. या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार संजॉयने संगीतबद्ध केलं आहे. तर याचे बोल खुद्द नोरा फतेही, संजॉय आणि वायू यांनी मिळून लिहिले आहेत. या गाण्यात नोराचा फक्त ग्लॅमर आणि डान्सच दिसत नाही, तर तिने गाण्याला आवाजसुद्धा दिला आहे.

पहा व्हिडीओ-

या म्युझिक व्हिडीओमधील राकेश बेदी यांची खास उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेते. आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगने आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थितीसाठी ओळखले जाणारे राकेश बेदी या गाण्याच्या बीट्सवर उत्तमरित्या ठेका धरताना दिसतात. त्यांच्यामुळे हा व्हिडीओ सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी लोकप्रिय ठरतोय. जागतिक संगीत दिनानिमित्त शिल्पा रावचं ‘या बाबा’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हा म्युझिक व्हिडीओ सध्या टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. याशिवाय इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही तो प्रेक्षकांना ऐकता येईल. ‘या बाबा’ या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन आदिल शेखने केलं आहे. अत्यंत भव्यदिव्य सेट्सवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. अलिशा सिंहने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

Follow Us