AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं

Kisses on Car : सोशल मीडियाच्या जमान्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. गर्लफ्रेंड हे काम करताना तो व्हिडिओ बनवत होता. सिकरवारने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला.

Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
Kisses on Car
| Updated on: Aug 25, 2026 | 3:18 PM
Share

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात सफेद रंगाच्या एका स्विफ्ट कारवर भरपूर साऱ्या kisses दिसत आहेत. यात मुलीच्या ओठांचं लिपस्टिक त्या कारवर उमटलेलं आहे. त्यामुळे रस्त्यावर धावताना लगेचच ही कार कोणाचही लक्ष वेधून घेते. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एक सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला कारवर 3400 वेळा किस करायला लावली आहे. पण या इन्फ्लुएन्सरला आता याची किंमत चुकवावी लागतेय. पहिलं म्हणजे वाहतूक पोलिसांनी त्याला दंड ठोठावला. त्यानंतर त्याला त्याची कार साफ करायला लावली. त्या सर्व Kisses त्याला त्याच्या हाताने पुसायला लावल्या. कार मालक आदित्य सिकरवार कित्येक तास गर्लफ्रेंडने कारवर केलेल्या Kisses पुसत बसलेला. कधी कार पुसायचा तर कधी कपाळावर आलेला घाम. मध्य प्रदेशच्या वाहतूक पोलिसांनी त्याची हालत खराब करुन टाकली.

सिकरवारचे इन्स्टाग्रामवर 3000 पेक्षा कमी फॉलोअर्स होते. म्हणून त्याला व्हायरल होणारा काँटेट बनवून स्वत:ची लोकप्रियता वाढवायची होती. यासाठी त्याने हे सर्व केलं. व्हायरल होण्यासाठी त्याने जी पद्धत अवलंबली ती चक्रावून टाकणारी होती. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला कारवर सर्वत्र किस करायला सांगितलं. त्याने गर्लफ्रेंडला 4 तासात 3400 वेळा किस करायला लावली.

खूप वैतागून त्याने हे काम केलं

गर्लफ्रेंड हे काम करताना तो व्हिडिओ बनवत होता. सिकरवारने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला. एक रील तर दिवसभरात 55 लाख लोकांनी पाहिली. व्हायरल व्हिडिओमध्ये कार रस्त्यावर पळताना संपूर्ण कारभर केलेले Kisses चे निशाण स्पष्टपणे दिसत होते. वाहतूक पोलिसांनी आदित्य सिकरवारला 5500 रुपयांचा दंड ठोठावला आणि कपडा, पाण्याची बादली घेऊन तिच कार त्याला धुवायला लावली.

एक-एक किस पुसण्यासाठी त्याला चांगलं 10 ते 15 वेळा कार कपड्याने पुसावी लागली. खूप वैतागून त्याने हे काम केलं. पुन्हा असं करणार नाही असं शब्द त्याने दिला. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. मध्य प्रदेशमधला हा प्रकार खूपच विचित्र आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....