Dhurandhar Akshaye Khanna Fa9la Song : रेहमान डकैतच्या ज्या गाण्यावर लोक तुटून पडलेत, त्याचा जन्म कुठल्या देशात झालाय? गायक कोण? VIDEO

Dhurandhar Akshaye Khanna Fa9la Song : सध्या धुरंधर चित्रपटाने लोकांना वेड लावलय. त्यात अक्षय खन्नाने रेहमान डकैत बनून कमालीचा परफॉर्मन्स दिला आहे. अक्षय खन्नाचं एक गाणं आहे, Fa9la. सोशल मीडियावर खासकरुन इन्स्टाग्रामवर लोकांना या गाण्याने वेड लावलं आहे. या गाण्याचा जन्म कुठल्या देशात झाला? त्याचा गायक कोण? जाणून घ्या इंटरेस्टिंग गोष्टी.

Dhurandhar Akshaye Khanna Fa9la Song : रेहमान डकैतच्या ज्या गाण्यावर लोक तुटून पडलेत, त्याचा जन्म कुठल्या देशात झालाय? गायक कोण? VIDEO
Akshaye Khanna Fa9la Song
| Updated on: Dec 09, 2025 | 9:48 AM

Akshaye Khanna Dhurandhar Fa9la Song : सध्या सोशल मीडियावर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केली आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने 100 कोटी कमाईचा टप्पा पार केला आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येक पात्राने आपली भूमिका एकदम चोख वठवली आहे. सर्वात जास्त कौतुक होतय ते अक्षय खन्नाच्या भूमिकेच. त्याने या चित्रपटात पाकिस्तानी अंडरवर्ल्ड डॉन रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात Fa9la नावाचं एक गाणं आहे. एका स्वागत सोहळ्यात अक्षय खन्ना या गाण्यावर डान्स करताना दिसतो.

चेहऱ्यावर नाटकी हास्यासह रेहमान डकैत या गाण्यावर डान्स करताना दिसतो. या गाण्यात अक्षयच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे, ते डॉनला साजेसं आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अक्षयच्या Fa9la गाण्यावरील डान्स व्हायरल झाला. लोकांनी अक्षयची तुलना बॉबी देओल सोबत सुरु केली. ज्या प्रकारे बॉबी देओलने एनिमल चित्रपटात ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स केला होता. ते गाणं आणि तो सीन खूप हाईप झालेला. बरोबर एकदम तसचं अक्षय खन्नावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याला लोक ट्रीट करत आहेत. Fa9la गाणं व्हायरल झालं आहे.

या गाण्याचा जन्म कुठल्या देशात झाला?

डायरेक्टर आदित्य धरने Fa9la गाणं अत्यंत उत्तम रित्या सादर केलय यात अजिबात शंका नाही. पण तुम्हाला माहित आहे का, हे गाणं कोणी बनवलय?. खरंतर या गाण्याचा जन्म बहरीन या देशात झाला. हे बहरीनी गाणं आहे. बहरीनी रॅपर Flipperachi ची ने गाण गायलं आणि लिहिलं आहे. 6 जून 2024 रोजी फ्लिपराचीच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं अपलोड झालेलं.

या गाण्याला किती लाख व्यूज आहेत?

DJ Outlaw ने हे गाणं प्रोड्यूस आणि मिक्स्ड केलेलं. बातमी लिहिताना यूट्यूबवर या गाण्याचे 72 लाख व्यूज आहेत. आता हे गाणं ‘धुरंधर’ च्या माध्यमातून भारतात खूप लोकप्रिय झालं आहे. लोक या गाण्याला नवीन ‘जमाल कुडू’ म्हणत आहेत. रिपोर्टनुसार हा FA9LA अरबी शब्द आहे. कथितरित्या या शब्दाचं उच्चारण Fasla आहे. फन टाइम किंवा पार्टीसाठी हा शब्द वापरला जातो. बहरीन भारतापासून जवळपास 2400 KM अंतरावर आहे. या गाण्यामुळे सध्या प्रसिद्धीचा सर्व झोत अक्षय खन्नावर आहे.