
आदित्य धर याच्या आगामी मच-अवेटेड धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. फिल्ममध्ये रणवीर सिंह सोबत आर. माधवन सुद्धा आहे. माधवन या चित्रपटात NSA अजित डोवाल यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसेल. हा महत्वाचा रोल आहे. माधवनचा चित्रपटातील लूक पाहून युजर्सना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीय. माधवन ट्रेलर लॉन्च इवेंटमध्ये या व्यक्तीरेखेबद्दल बोलला. या पीरियड ड्रामा चित्रपटात आपला रोल साकारण्यासाठी कशी तयारी केली? ते माधवनने सांगितलं. एका प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना आदित्यने मला या चित्रपटाची कथा ऐकवली असं ट्रेलर लॉन्चच्यावेळी माधवन म्हणाला. “मला आठवतय, एक दिवस आदित्य मला भेटायला आला. त्यावेळी मी कुठल्यातरी शूटमध्ये होतो. त्याने धुरंधरची कथा ऐकवली. कथा ऐकता-ऐकता माझ्या मनात आलं. यार, हा माणूस आतापर्यंत कुठे होता. मला अनेक ऐतिहासिक चित्रपटांचा भाग होण्याची संधी मिळाली आहे. पण हा चित्रपट एकदम वेगळा असेल” असं माधवन म्हणाला.
फिल्मच्या लूक टेस्टसाठी किती वेळ लागला, ते माधवनने सांगितलं. “ज्यावेळी धुरंधरसाठी लूक टेस्ट देत होतो, त्यावेळी चार तास लागले. असं वाटायचं की कुठेना कुठे कमतरता आहे. त्यावेळी आदित्य आला आणि बोलला. तुला आपले ओठ पातळ करावे लागतील. फक्त हा छोटासा बदल केल्यानंतर संपूर्ण लूक परफेक्ट वाटला” असं माधवन म्हणाला.
अजित डोवाल बनण्यासाठी मेहनतही तितकीच
माधवन पुढे बोलताना म्हणाला की, ‘धुरंधर चित्रपटात काम करणं सन्मानाची बाब आहे. या चित्रपटात प्रतिभावंत कलाकार आहेत’ माधवन या चित्रपटात बिलकुल वेगळ्या अंदाजात दिसला आहे. ब्लाड लूक आहे. डोक्यावर केस कमी आहेत. चेहऱ्यावरही मेकअपमधून अनेक बदल करण्यात आले आहेत. माधवन बोलण्यासाठी वेगळी शैली वापरली आहे. माधवनला दररोजच्या मेकअपसाठी जवळपास तीन ते चार तास लागायचे. त्यामुळे अजित डोवाल बनण्यासाठी माधवनला मेहनतही तितकीच करावी लागली आहे. अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त असे अनेक मोठे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. रणवीर सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.