लेकरांचा जीव धोक्यात, एका आई म्हणून…, दिया मिर्झाची थेट फडणवीसांकडे विनंती, व्यथा मांडत म्हणाली..

Dia Mirza on Mumbai air pollution: लेकरांचा जीव धोक्यात असल्यामुळे एक आई म्हणून दिया मिर्झाची थेट फडणवीसांकडे विनंती, व्यथा मांडत म्हणाली..., अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट सोशल मीडियावर होतेय तुफान व्हायरल

लेकरांचा जीव धोक्यात, एका आई म्हणून..., दिया मिर्झाची थेट फडणवीसांकडे विनंती, व्यथा मांडत म्हणाली..
| Updated on: Jan 31, 2025 | 1:02 PM

Dia Mirza on Mumbai air pollution: अभिनेत्री दिया मिर्झा कायम पर्यावरणाबद्दल काळजी व्यक्त करताना दिसते. आता देखील अभिनेत्रीने ट्विट करत वायू प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे त्याचा परिणाम सामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं यासाठी दिया हिने ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे. सध्या अभिनेत्रीनं केलेलं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करत दिया मिर्झा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या समस्येचं निराकरण करण्यासाठी जलद आणि प्रभावी कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय एक आई म्हणून अभिनेत्रीने मुलांच्या आरोग्याची देखील चिंता व्यक्त केली आहे.

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये टॅग करत दिया म्हणाली, ‘मुंबई आणि महाराष्ट्रातील वायू प्रदूषणामुळं आमच्या लेकरांच्या फुफ्फुसांवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. एक आई म्हणून मी विनंती करते की, तातडीनं या मुद्द्यावर लक्ष द्या…’ ट्विटवर नेटकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

ट्विटवर पोस्ट शेअर करत दिया मिर्झा हिने वेगवेगळ्या भागातील हवामनाची गुणवत्ता देखील शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टमध्ये शहरातील हवेचा AQI किती घसरला आहे हे स्पष्ट पाहता येत आहे. सध्या दिया मिर्झा हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिया मिर्झा हिचे सिनेमे

एक काळ असा होता, जेव्हा दियाचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. ‘रहना है तेरे दिल मैं’ सिनेमातून दियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री ‘दम’, ‘तहजीब’, ‘परिणीता’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘संजू’, ‘थप्पड़’ आणि ‘भीड’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली. दिया आता बॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.