Aly Goni-Jasmin Bhasin: ‘बिग बॉस’ फेम अली-जास्मिन लग्नबंधनात अडकणार? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

अलीच्या या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर जास्मिन भसीनची (Jasmin Bhasin) प्रतिक्रियाही समोर आली आहे. ती म्हणाली, जर तुम्ही अलीची स्टोरी पाहिली असेल, तर तुम्हाला कळलं असेलच की अखेर अली आणि मी हे पाऊल उचलत आहोत.

Aly Goni-Jasmin Bhasin: बिग बॉस फेम अली-जास्मिन लग्नबंधनात अडकणार? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
Aly Goni, Jasmin Bhasin
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 6:07 PM

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) आणि अली गोनी (Aly Goni) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या गोड नात्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे हे जोडपं लवकरच त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणार आहेत. होय, अली गोनीने त्याच्या सोशल मीडियावरील एका व्हिडिओत जास्मिन भसीनसोबतच्या लग्नाचा (Marriage) खुलासा केला आहे. त्याच्या आई-वडिलांनी या नात्याला मान्यता दिली असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी त्याने चाहत्यांना दिली. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत अली गोनी म्हणाला, ‘अखेर ही गोष्ट पक्की झाली आहे. मी आणि जास्मिन भसीनने आमच्या पालकांना सांगितलं आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. फक्त निमंत्रण पत्रिका वाटणं बाकी आहे. पण आम्ही दोघांनीही डिजिटल पद्धतीने सर्वांना सांगू असा विचार केला आहे.’

या व्हिडीओमध्ये अली गोनीने लग्नाचा उल्लेख केला नसून फक्त पालकांची संमती मिळाल्याचं सांगितलं आहे. यावरून चाहते त्याच्या लग्नाबाबत अंदाज वर्तवत आहेत. तर हा कुठला प्रमोशनल व्हिडीओ तर नाही, असाही सवाल काहींनी उपस्थित केला आहे. अलीच्या या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर जास्मिन भसीनची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ती म्हणाली, जर तुम्ही अलीची स्टोरी पाहिली असेल, तर तुम्हाला कळलं असेलच की अखेर अली आणि मी हे पाऊल उचलत आहोत. आम्ही खूप उत्सुक आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हीही उत्सुक असाल. आता आम्ही तारीख जाहीर करेपर्यंत प्रतीक्षा करा.

पहा व्हिडीओ

अली गोनी आणि जास्मिन भसीनचे हे व्हिडिओ असले तरी आजकाल स्टार्स अशा पोस्ट्सद्वारे त्यांच्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन करताना दिसतात आणि नंतर सांगतात की हा त्यांच्या प्रोजेक्टचा भाग होता. त्यामुळे ही नेमकी भानगड काय आहे, हे अली आणि जास्मिनच चाहत्यांना सांगू शकतील.