Video | अली गोनीशी लग्न करण्याबाबत जास्मीन भसीनचा मोठा निर्णय, ऐकून चाहतेही झाले निराश!

अली आणि जास्मीन दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाच्या वृत्तामुळे खूप खुश आहेत. मात्र, आता जास्मीन भसीनने तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

Video | अली गोनीशी लग्न करण्याबाबत जास्मीन भसीनचा मोठा निर्णय, ऐकून चाहतेही झाले निराश!
अली गोनी-जास्मीन भसीन

मुंबई : ‘बिग बॉस 14’चे (Bigg Boss 14) लव्हबर्ड्स अर्थात मालिका विश्वातली प्रसिद्ध जोडी अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) हे सध्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. अली आणि जास्मीन दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाच्या वृत्तामुळे खूप खुश आहेत. मात्र, आता जास्मीन भसीनने तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. नुकतेच जास्मीन भसीनला मुंबईतील एका सॅलोन बाहेर स्पॉट केले गेले. सॅलोनमधून बाहेर पडत असताना तिला माध्यमांनी घेरले होते. यावेळी अभिनेत्रीने माध्यमांशी खास चर्चा केली (Bigg Boss fame Actress Jasmin Bhasin reacted on the news of marriage with Aly Goni).

सॅलोनमधून बाहेर पडताच जास्मीन भसीनने होळीनिमित्ताने मीडियाला शुभेच्छा दिल्या. ज्यानंतर मीडियाने तिला विचारले की, तुझे आणि अली गोनीचे लग्न नेमके कधी होणार आहे? तुमच्या दोघांचेही गाणे सोशल मीडियावर सुपरहिट ठरले आहे. मग तुम्ही कधी लग्न करणार आहात?  माध्यमांच्या या प्रश्नावर उत्तर देताना जास्मीन असे म्हणाली की, ‘तुम्ही सगळे सध्या माझ्या लग्नाविषयी का बोलत आहात? आम्ही सध्या एकमेकांच्या प्रेमात आहोत. सध्या आमची लग्नाची किंवा इतर कोणतीही मोठी योजना नाही. आम्हाला, अजून एकमेकांना समजून घ्यायचे आहे. ज्यानंतर आम्ही लग्नाबद्दल विचार करू.’

पाहा जास्मीनचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(Bigg Boss fame Actress Jasmin Bhasin reacted on the news of marriage with Aly Goni)

जास्मीन भसीनचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर असे दिसते की, ती अद्याप लग्नाच्या मूडमध्ये नाही. तिच्याकडे सध्या कामाची रांग लागली आहे. हातातली कामे संपल्यानंतर लग्नासाठी विचार करणार आहे. काहीच दिवसांपूर्वी जास्मीन भसीन अली गोनीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मुंबईहून जम्मूला गेली होती. तेव्हापासून या जोडीच्या लग्नाच्या चर्चेला आणखी हवा मिळाली होती (Bigg Boss fame Actress Jasmin Bhasin reacted on the news of marriage with Aly Goni).

जास्मीनसाठी ‘बिग बॉस’मध्ये अलीची एंट्री!

‘बिग बॉस 14’च्या घरात सुरुवातीला जास्मीन थोडी चिंताग्रस्त होती. पण, अली गोनी जेव्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला, तेव्हा जास्मीनचे एक नवे रूप सर्वांसमोर आले. जास्मीनसाठी अलीने ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर ‘पंगे’ घेतले होते. या घरात अलीने रुबीनाला आपली बहीण मानले, तर राहुलबरोबरची त्याची मैत्री प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेली. तर, घरातून सुरुवातीला एलिमिनेट झालेली जास्मीन हिची काही काळानंतर घरात पुन्हा एकदा ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्री झाली होती. मात्र, तेव्हा ती खूप नकारात्मक दिसत होती आणि रुबीनाबरोबरही तिचा वाद झाला होता. अलीने नेहमीच तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला होतं. चाहत्यांनीही या दोघांच्या जोडीला खूप प्रेम दिले.

जास्मीनसाठी काहीही!

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर अलीने माध्यमांशी संवाद साधला होता. जास्मीनबरोबरच्या नात्याविषयी बोलताना अली म्हणाला की, मी जास्मीनसाठी काहीही करू शकतो. तो म्हणाला, ‘मी जास्मीन भसीनसोबत डेटवर जाऊ इच्छितो. आता कार्यक्रम संपला आहे, तेव्हा मी स्वत:चा आणि जास्मीनचा आरामात विचार करू शकतो. मला तिच्यासाठी सर्वकाही सर्वोत्तम हवे आहे. मला कोणतीही घाई नाही आणि मला एकामागून एक सावकाश सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. गरज भासल्यास मी जास्मीनच्या आई-वडिलांना आमच्या लग्नासाठी तयार करण्यासाठी काहीही करेन.’

(Bigg Boss fame Actress Jasmin Bhasin reacted on the news of marriage with Aly Goni)

हेही वाचा :

PHOTO | वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा सेटवर परतली अनुष्का शर्मा, ‘कूल लूक’ पाहून चाहतेही उत्सुक!

‘सलमान खानने मला फसवलं’, एक्स-गर्लफ्रेंड असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सोडले ब्रेकअपवर मौन!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI