Dawood Ibrahim Brother: दाऊद इब्राहिमच्या भावाने लिहिलं गाणं, लता मंगेशकरच्या आवाजात ठरलं सुपरहिट, तुम्ही ऐकलंत का?
Dawood Ibrahim Brother: चित्रपटसृष्टीचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या अफवा अनेकदा पसरल्या आहेत. अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे समोर आले होते. पण तुम्हाला माहित आहे का की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाने एका हिंदी चित्रपटासाठी एक गाणेसुद्धा लिहिले होते?

१९९४ मध्ये सलमान खानचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रवीना टंडन दिसली होती. या चित्रपटाचं एक गाणं दाऊद इब्राहिमच्या भावाने लिहिलं होतं. ३५ वर्षं जुनं हे गाणं त्याकाळी हिट ठरलं होतं. या गाण्याची खासियत अशी होती की, यात मुंबईच्या १२ रस्त्यांच्या नावांचा उल्लख करण्यात आला होता. तुम्हाला माहीत आहे का हे कोणतं गाणं आहे ते? चला जाणून घेऊया…
लता मंगेशकर आणि एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्या आवाजात सजलेलं ते गाणं आहे. १९९४ मध्ये आलेल्या चित्रपट ‘पत्थर के फूल’मधील गाणं ‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ’ हे आहे. हे गाणं त्याकाळी लोकांना खूप आवडलं होतं. गाण्यात रवीना आणि सलमानची जोडीही लोकांनी प्रेमाने स्वीकारली आणि हे गाणं हिट ठरलं. लोक आजही हे गाणं आवडीने ऐकतात.
मुंबईच्या १२ रस्त्यांच्या नावांसह असलेलं गाणं
१९९१ मध्ये सलमान खान आणि रवीना टंडनचा चित्रपट ‘पत्थर के फूल’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. चित्रपटाचं एक गाणं ‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ’ खूप लोकप्रिय झालं होतं. हे गाणं लिहिणाऱ्या टीममध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ सामील होता. या गाण्याच्या लेखकांबद्दल जर तुम्ही गूगलवर शोध घेतला तर त्यात देव कोहली आणि रविंदर रावल यांसारखी नावंही दिसतील. काही स्रोतांमध्ये (अॅपल म्युझिक) नूर कास्कर हे नाव आहे. नूर हा दाऊदचा भाऊ होता. हे गाणं यासाठीही लोकप्रिय होतं कारण यात मुंबईच्या १२ रस्त्यांची नावं घेतली होती.
१९९१ मध्ये आलेला चित्रपट ‘पत्थर के फूल’ हा अॅक्शन-रोमँटिक चित्रपट आहे. अनंत बलानी यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट जी.पी. सिप्पी आणि विवेक वासवानी यांनी निर्मित केला होता. चित्रपटाची कथा एका पोलिस अधिकाऱ्याच्या आणि एका मुलीच्या प्रेमावर आधारित आहे. हा चित्रपट १९९१ मध्ये हिट ठरला होता. या चित्रपटाद्वारे रवीनाने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं होतं. चित्रपटात १३ गाणी होती, त्यात ‘कभी तू छलिया लगता है’, ‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ’, ‘सजना तेरे बिना क्या जीना’ ही सर्व गाणी हिट होती.
हे गाणं त्याकाळी यासाठीही चर्चेत राहिलं कारण यात मुंबईच्या रस्त्यांची नावं घेतली होती. गाण्यात बोल आहेत – कधी लिंकिंग रोड, वॉर्डन रोड, कॅडल रोड, पेडर रोड, टर्नर रोड, कार्टर रोड, चर्नी रोड… या पद्धतीने या गाण्यात मुंबईच्या १२ रस्त्यांची नावं आहेत. गाण्याचं संगीत इतकं रोमँटिक आहे की ते ऐकणाऱ्यांच्या हृदयाला स्पर्श करतं.