
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. राजश्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल बोत आहे. व्हिडीओमध्ये राजश्री मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाला चांगलाच धडा शिकवताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलहा राहिल शेख याचा आहे. व्हिडीओमध्ये राहिल नशेत अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. व्हिडीओमध्ये राहिल, राजश्री हिला शिविगाळ करताना दिसत आहे. घडलेली पूर्ण घटना राजश्री हिने मोबाईलमध्ये कैद केली आहे. अशात राजश्री मोरे कोण आहे आणि काय करते? याबद्दल चर्चा सुरु आहेत.
राजश्री मोरे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती एक बिजनेसवुमन आणि मॉडेल आहे. राजश्री हिने सिनेमांमध्ये देखील काम केलं. प्रोफेशनल आयुष्यात राजश्री गेल्या सात वर्षांपासून सक्रिय आहे. राजश्री हिचा जन्म रात्नागिरी येथील लांजा येथे झाला होता. तिने मराठी शाळेत शिक्षण घेतलं पण हायस्कूल उत्तीर्ण होऊ शकली नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, राजश्रीचं अद्याप लग्न झालेलं नाही आणि ती अविवाहित आहे.
सुरुवातीला राजश्री हिने अनेक संकटांचा सामना केला. राजश्री हिच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. पण राजश्री 16 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. आता तिच्या घरी आई आहे. शिवाय एक मोठा भाऊ आणि एक बहीण देखील आहे.
राजश्री हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिचं नेल आर्ट पार्लर आहे. शिवाय राजश्री हिचे मुंबईतील मालाड येथील एव्हरशाईन नगर येथे एक ब्युटी पार्लर देखील आहे. ब्युटी पार्लरचा सल्ला राजश्री हिला लक्ष्मी नावाच्या ब्युटीशियनने दिलेला. आता तिने या पार्लरच्या आणखी 2 शाखा उघडल्या आहेत ज्यांचा व्यवसाय खूप चांगला चालत आहे.
राजश्री टीव्ही आणि ग्लॅमरच्या जगात सक्रिय आहे आणि या इंडस्ट्रीत तिचे अनेक चांगले मित्र आहेत. टीव्हीची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत तिची चांगली मैत्रीण आहे. त्या दोघींनाही अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दोघी खास मैत्रिणी देखील होत्या. दोघींची पहिली भेट नेल आर्ट स्टुडिओमध्ये झाली होती.
राजश्री मोरे सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जवळपास 30 नेटकरी राजश्री हिला फॉलो करतात. राजश्री कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चर्चेत असते.