
Aamir Khan – Jessica Hines: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्यावर भाऊ फैजल खान याने गंभीर आरोप केले आहे. फैजल खान याने मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत आमिर खान याच्यावर गंभीर आरोप करत मोठे खुलासे देखील केले आहेत. फैजल याने आमिर खान याचं नाव जेसिका हाइन्स नावाच्या एका महिलेसोबत जोडलं. या कॉन्फरन्समध्ये फैसलने असा दावा केला की, आमिर खान त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्याशी लग्न केल्यानंतर जेसिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वी फैसलने आमिरवर आरोप केले होते आणि म्हटले होते की आमिर त्याला घरात कोंडून ठेवून त्याचा छळ करायचा. जाणून घेऊ काय आहे संपूर्ण प्रकरण?
आमिर खान याचं खासगी आयुष्य सध्या तुफान चर्चेत आलं आहे. आमिर खानवर फैसलने त्याच्यावर आरोप केला आणि म्हणाला तो जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांना एक मुलगाही होता. फैसलच्या या विधानाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
फैजल याने ज्या महिलेसोबत आमिर खान याचं नाव जोडलं आहे, त्या महिलेचे फोटो आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. जेसिका ही एक लेखिका आहे. 1998 मध्ये तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. ज्यामुळे ती भारतात आली होती. त्यानंतर जेसिका हिची ओळख आमिर खान याच्यासोबत झाली. तेव्हा आमिर ‘गुलाम’ सिनेमाची शुटिंग करत होता.
2207 मध्ये, जेसिकाचे प्रसिद्ध पुस्तक ‘लुकिंग फॉर द बिग बी’ लाँच झालं. या पुस्तकामुळे ती भारतातच राहिली आणि आमिर खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सशी तिचे चांगले संबंध निर्माण झाले. 2007 मध्ये तिने लंडनमधील एका व्यावसायिकाशी लग्न केलं आणि त्यानंतर ती भारतीय सेलिब्रिटींपासून लांब राहिली…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2005 मध्ये जेसिकाने ब्रिटीश मासिक स्टारडस्टला मुलाखत देताना आमिरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलली होती . तेव्हा जेसिका आणि आमिर खान यांचं नातं सर्वत्र चर्चेत होतं. पण अभिनेत्याने कायम नात्यावर मौन बाळगलं. पण 20 वर्षांनंतर दोघांच्या नात्याची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. आमिर खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो… चाहत्यांमध्ये कायम अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते.