‘बाप पे मत जाना…’ असं म्हणणारी डॉली बिंद्रा आहे कुठे? वयाच्या 55 व्या वर्षीही मुल नाही, करते असं काम?

Dolly Bindra: वयाच्या 55 व्या वर्षी डॉली बिंद्रा करते असं काम, बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री जगतेय असं आयुष्य, 'बाप पे मत जाना...' डायलॉगमुळे आली होती प्रसिद्धीझोतात, एकेकाळी झगमगत्या विश्वात चर्चेत होती डॉली, पण कुठे आणि कशी आहे अभिनेत्री?

बाप पे मत जाना... असं म्हणणारी डॉली बिंद्रा आहे कुठे? वयाच्या 55 व्या वर्षीही मुल नाही, करते असं काम?
| Updated on: Jan 21, 2025 | 8:25 AM

Dolly Bindra: ‘बाप पे मत जाना…’ हा डायलॉग आज देखील अनेक जण सर्रास वापरतात. हा डायलॉग ‘बिग बॉस 4’ शो दरम्यानचा आहे. जेव्हा हा डायलॉग डॉली बोलायची तेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात दरारा निर्माण व्हायचा. पण आता डॉली कुठे आहे? काय करते? याबद्दल फार कोणाला माहिती नाही. तर आज डॉली बिंद्राच्या 55 व्या वाढदिवशी तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणू घेऊन.

डॉली बिंद्राचा जन्म 20 जानेवारी 1970 रोजी मुंबईत पंजाबमधील एका कुटुंबात झाला. तिच्या आईचं नाव जसवंत कौर आहे. डॉलीला एक बहीणही आहे. डॉलीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती आणि ती अनेक प्रिंट शूटमध्ये दिसली होती. ती 90 च्या दशकात डॉलीला अभिनेत्री जुही चावला हिची कार्बन कॉपी असं देखील म्हटलं जायचं.

डॉलीने तिच्या करियरची सुरुवात ‘खिलाडीयो का खिलाडी’ सिनेमातून केली. सिनेमा 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर डॉलीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. डॉली हिने ‘बिच्छू’, ‘खिलाडी 420’, ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘स्टाइल’ आणि ‘धमाल’ या सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली.

डॉलीने फक्त सिनेमांमध्येच नाही तर, अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. जैसे ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘कहीं किसी रोज’, ‘अरमानों का बलिदान’ आणि ‘अदालत’ या मालिकांमध्ये अभिनेत्री दिसली. त्यानंतर 2010 मध्ये डॉली ‘बिग बॉस 4’ शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. शो मधील डॉलीचा एक डायलॉग आजही चर्चेत आहे ‘बाप पे मत जाना…’

डॉली बिंद्रा हिचं खासगी आयुष्य

डॉली हिने कैजाद किरमणी याच्यासोबत लग्न केलं आहे. कैजाद किरमणी दुबईत राहतात. आता डॉली देखील पतीसोबत दुबईत राहतात. डॉली आता बॉलिवूडपासून दूर व्यवसाय करत आहे. पण वयाच्या 55 व्या वर्षी देखील डॉली हिला मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही.

रिपोर्टनुसार, डॉली जेव्हा राधे माँला भेटली तेव्हा चर्चेत आली होता. तेव्हा डॉलीचं मिसकॅरेज झालं होतं आणि अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हा डॉलीने तब्बल 4 वर्ष भक्ती केली. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे 2015 मध्ये डॉलीने राधे माँवर लैंगिक छळाचे आरोप केले होता.

डॉली हिने राधे मां विरोधात तक्रार देखील दाखल केली होती. पत्रकारांशी बोलताना डॉली हिने राधे माँ माझ्यावर काळी जादू करत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राधे माँच्या काही भक्तांनी डॉलीच्या विरोधात तिची प्रतिमा डागाळल्याबद्दल तक्रार दाखल केली होती.