महिमा चौधरीच्या मुलीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, 17 व्या वर्षी दिसते आईपेक्षा उंच, तिला पाहून म्हणाल…
Mahima Chaudhry Daughter: लेकीच्या सौंदर्यापुढे महिमा चौधरीचा ग्लॅमर फिका, अभिनेत्रीची लेक दिसते प्रचंड सुंदर, 17 व्या वर्षी दिसते आईपेक्षा उंच, तिला पाहून म्हणाल..., महिमा कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Mahima Chaudhry Daughter: अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची लेक आराध्या बच्चन, करिश्मा कपूर हिचे लेक समायरा कपूर कायम सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आराध्याचे तर आईसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता अभिनेत्री महिमा चौधरी हिच्या लेकीच्या चर्चा रंगल्या आहेत. महिमा चौधरी हिची लेक आता अभिनेत्रीपेक्षा अधिक सुंदर दिसते. सांगायचं झालं तर, स्टारकिड्सच्या काळात महिमाची लेक मात्र लाईमलाईट पासून दूर असते.
महिमा चौधरी हिच्या लेकीचं नाव आर्यना चौधरी (Aryana Chaudhry) असं आहे. आर्यना हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते. आर्यना चौधरी हिचा सुंदर चेहरा, देखीव डोळे, तिच्या स्माईलने तर, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. खुद्द महिमा हिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने कुटुंब आणि मुलीसोबत फोटोंचा व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.




View this post on Instagram
महिमाचा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘एका ट्विस्टसोबत व्हेकेशन… विमानांपासून दुरावा नाही… अनेक टेक ऑफ आणि लँडिग पाहिल्या… उत्तम दृश्य होतं…’ असं कॅप्शन लिहित अभिनेत्रीने हॉटेल रुम देखील व्हिडीओमध्ये दाखवला आहे. व्हिडीओमध्ये आर्याना देखील दिसत आहे. अभिनेत्री लेक आणि अन्य लोकांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार महिमाची लेक?
एका मुलाखतीत देखील आर्याना हिला विचारण्यात आलं होतं की, ‘आई प्रमाणेच बॉलिवूडमध्ये करियर करणार का?’ यावर आर्याना म्हणाली होती, ‘मला माझ्या आईप्रमाणे अभिनेत्री व्हायचं आहे…’ वयाच्या 17 व्या वर्षी महिमा चौधरी हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.
महिमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर महिमाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच महिमाचा ‘इमर्जन्सी’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे.