युजवेंद्रकडून धनश्रीने केलीये पोटगीची मागणी? रक्कम ऐकून भुवया उंचावतील
Dhanashree & Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहल - धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी धरलाय जोर, धनश्रीकडून इतक्या कोटींची मागणी, पोटगीची रक्कम ऐकून व्हाल हैराण...

Dhanashree & Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. पण यावर युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा यांनी कोणतीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. तर दुसरीकडे घटस्फोटानंतर धनश्रीला किती पोटगी मिळेल याची देखील चर्चा जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार धनश्री हिने युजवेंद्र चहल याच्याकडून तब्बल 60 कोटी रुपयांचा मागणी केली आहे. पण अद्याप क्रिकेटरने धनश्री पैसे दिले नसल्याची देखील माहिती समोर येत आहे.
पोटगीच्या रकमेमुळे युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा यांचा घटस्फोट रखडला आहे… असा देखील दावा करण्यात येत आहे. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? धनश्रीने खरोखरच युजवेंद्र चहलकडे पोटगी म्हणून 60 कोटी रुपये मागितले आहेत का? नक्की सत्य काय आहे जाणून घेवू.
मीडियारिपोर्टनुसार, दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. आतापर्यंत धनश्रीने पोटगीची मागणी केलेली नाही. शिवाय तिने घटस्फोटावर अधिकृत वक्तव्य देखील केलेलं नाही. शिवाय युजवेंद्र याने देखील घटस्फोटावर अधिकृत वक्तव्य देखील केलेलं नाही.




मात्र, याआधी युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने कौटुंबिक, मूल्ये आणि चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल वक्तव्य केलं होते. एवढंच नाही तर, क्रिकेटरने पैशाच्या व्यवहाराबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा निराधार असून धनश्रीने कोणतीही मागणी केलेली नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांची नेटवर्थ
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची संपत्तीत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या युजवेंद्र चहलची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री 23 कोटींहून अधिक रुपयांची मालकीण आहे. मात्र, दोघांमध्ये मतभेद कशामुळे झाले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
युजवेंद्र चहलने डिलिट केलेत फोटो
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे युजवेंद्र चहल याने सोशल मीडियावर बायकोसोबत असलेले फोटो देखील डिलिट केले आहे. दोघे लवकरच घटस्फोट घेण्याची शक्यता आहे… असं देखील सांगण्याता येत आहे. एवढंच नाही तर, दोघांनी इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना अनफॉलो केलं आहे. पण यावर दोघांनी देखील मौन बाळगलं आहे.