
मुंबई | 10 मार्च 2024 : मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले यांदाच्या वर्षी भारतात आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले मोठ्या थाटात पार पडला आहे. मिस वर्ल्ड 2024 च्या फिनालेमध्ये अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्म देखील केलं. यंदाच्या वर्षी स्पर्धेत 115 देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मिस वर्ल्ड 2024 मध्ये क्रिस्टीना पिजकोव्हाने हिने विजेतेपद पटकावले आहे. तर लेबनॉनची यास्मिना जायतौन ही या स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली.
विजेत्या स्पर्धकांचं नाव घोषित केल्यानंतर, गतवर्षीची विजेती कॅरोलिना बिएलॉस्का हिने विजेत्या आणि उपविजेत्याच्या डोक्यावर मुकुट घातला. सध्या संपूर्ण जगात फक्त आणि फत्त क्रिस्टीना पिजकोव्हा हिची चर्चा रंगली आहे. तर जाणून घेऊ 25 वर्षीय क्रिस्टीना पिजकोव्हा कोण आहे?
क्रिस्टीना पिजकोव्हा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचा जन्म 19 जानेवारी 1999 मध्ये चेक रिपब्लिक याठिकाणी झाला होता. देशाची राजधानी प्राग येथील चार्ल्स युनिव्हर्सिटीमधून ती कायद्याची पदवी घेत आहे. याशिवाय मॅनेजमेंटचा कोर्सही करत आहे. क्रिस्टीना पिजकोव्हा अनेक क्षेत्रांमध्ये पुढे आहे.
शिक्षणासोबतच क्रिस्टीना पिजकोव्हा तिची आवड देखील जपत आहे. क्रिस्टीना पिजकोव्हा हिने Miss World 2024 चा किताब स्वतःच्या नावावर केल्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. क्रिस्टीना पिजकोव्हा हिला समाजाची सेवा करायला देखील आवडतं. यासाठी क्रिस्टीना पिजकोव्हा एक फाउंडेशन देखील चालवते. ज्याच्या माध्यमातून क्रिस्टीना पिजकोव्हा गरजूंसाठी शैक्षणिक कार्यक्रम चालवते आणि मानसिक रुग्णांनाही मदत करते.
Miss World 2024 स्पर्धेत सिनी शेट्टी हिने देखील चांगली कामगिरी केली. तिला भारतीय चाहत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. मुंबईत शिकलेल्या सिनीने तिच्या जन्मस्थानी मुंबईत मिस वर्ल्ड स्पर्धा लढवली पण ती स्पर्धा जिंकू शकली नाही.
सिनीने 115 देशांतील सहभागी मॉडेल्समध्ये चांगली स्पर्धा केली आणि टॉप 8 मध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पुढच्या फेरीसाठी सिनी हिची स्पर्धा लेबनॉनच्या यास्मिनशी होती. पण टॉप 4 मध्ये सिनी हिला स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त Miss World 2024 स्पर्धेची चर्चा सुरु आहे.