AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 26 व्या वर्षी एडल्ट फिल्म स्टारने संपवलं आयुष्य, सावत्र वडील म्हणाले…

वयाच्या 26 व्या वर्षी एडल्ट फिल्म स्टारने संपवलं स्वतःचं आयुष्य... अभिनेत्री राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ... तीन महिन्यात तिसऱ्या अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवल्यामुळे चर्चांना उधाण...

वयाच्या 26 व्या वर्षी एडल्ट फिल्म स्टारने संपवलं आयुष्य, सावत्र वडील म्हणाले...
| Updated on: Mar 10, 2024 | 11:44 AM
Share

मुंबई | 10 मार्च 2024 : एडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून एडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री स्वतःचं आयुष्य संपवत आहेत. जानेवारी महिन्यात अभिनेत्री थॅना फील्ड्स (Thaina Fields) तिच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळली. तिच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात काग्नी लिन कार्टर (Kagney Linn Karter) हिने वयाच्या 36 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता पुन्हा एका एडल्ट फिल्म अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

दोन अभिनेत्रींनंतर प्रसिद्ध एडल्ट फिल्म अभिनेत्री सोफिया लियोनी हिने देखील स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. सोफिया लियोनी हिने वयाच्या 26 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सोफिया लियोनी राहत्या घरात मृत अवस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

रिपोर्टनुसार, सोफिया लियोनी हिचे सावत्र वडील मायक रोमेरो यांनी एक स्टेटमेंट जारी करत सोफिया हिच्या निधानाची माहिती दिली आहे. सोफिया हिचे सावत्र वडील म्हणाले, ‘सोफियाच्या निधनानंतर तिची आई आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक तिच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबिय आणि तिच्या मित्रांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.’

सोफिया हिच्या सावत्र वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी सोफिया तिच्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली. सोफिया यांच्या निधनानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत. सोफिया हिला फिरायला प्रचंड आवडायचं… आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाला कसं आनंदी ठेवता येईल याकडे ती अधिक लक्ष द्यायची… असं देखील अभिनेत्रीचे वडील म्हणाले आहेत.

सोफिया लियोनी हिच्या निधनानंतर सोशल मीडियावर संतापाचं वातावरण तयार झालं आहे. कमी वयात अभिनेत्री स्वतःचं आयुष्य का संपवत आहेत… संशयास्पद मृत्यू का होत आहेत ? असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहेत… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोफिया लियोनी हिच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या तिसऱ्या महिन्यातील हे तिसरं प्रकरण असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एडल्ट स्टार्स यांच्या निधनाची वाढती संख्या पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?