Rekha Life Controversy: सिंदूरपासून इंटिमेट सीनपर्यंत…, रेखा यांच्या आयुष्यातील 5 सर्वात मोठे वाद

Rekha Life Controversy: रेखा यांच्या आुयुष्यात फार कमी काळ टिकला आनंद..., सिंदूरपासून इंटिमेट सीनपर्यंत..., फार कमी लोकांना माहिती आहेत, त्यांच्या आयुष्यातील 'हे' 5 मोठे वाद, आज बॉलिवूडपासून दूर असल्यातरी रेखा कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

Rekha Life Controversy: सिंदूरपासून इंटिमेट सीनपर्यंत..., रेखा यांच्या आयुष्यातील 5 सर्वात मोठे वाद
| Updated on: Aug 20, 2024 | 11:06 AM

अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रेखा प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या. पण खासगी आयुष्यात मात्र रेखा यांना अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. रेखा यांच्या आयुष्यातील काही असे वाद आहेत, जे कधी विसरले जाऊ शकत नाहीत. तर आज रेखा यांच्या आयुष्यातील अशा 5 वादग्रस्त गोष्टींबद्दल जाणून घेऊ, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.

विश्वजीत यांच्यासोबत किसीवर वाद – 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंजाना सफर’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रेखा यांनी वाईट गोष्टीचा सामना केला. सिनेमात अभिनेते विश्वजीत मुख्य भूमिकेत होते. सिनेमात एका गाण्यात किसींग सीन होता. सीन शूट झाल्याानंतर देखील विश्वजीत यांनी 5 मिनिटं रेखा यांना किस केलं. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर देखील विश्वजीत, रेखा यांना किस करत राहिले. ज्यामुळे रेखा यांच्यावर वाईट परिणाम झाला होता. कारण रेखा तेव्हा फक्त 15 वर्षांच्या होत्या.

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अफेअर – रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. याचदरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण तेव्हा बिग बी विवाहित होते. रेखा – अमिताभ यांच्या नात्यामुळे अनेक वाद रंगले होते. तेव्हा कुटुंबाला प्राधान्य देत बिग बी यांनी प्रेमाचा त्याग केला.

रेखा यांच्या पतीचा मृत्यू – रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण रेखा यांना वैवाहिक आयुष्याचा आनंद फार काळ घेता आला नाही. मुकेश यांच्या आयुष्यात काही अडचणी आल्यामुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. ज्यामुळे रेखा यांना टीकेचा सामना करावा लागला.

रेखा यांचं सिंदूर – पतीच्या मृत्यूनंतर देखील रेखा आजही सिंदूर लावतात. एक काळ असा होता जेव्हा सिंदूरमुळे रेखा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. रेखा, अमिताभ बच्चन यांच्या नावाचा सिंदूर लावतात… अशा देखील चर्चा रंगल्या होत्या. यावर एका पुरस्कार सोहळ्यात रेखा म्हणाल्या होत्या, ‘कोण काय बोलतंय याला मला फरक पडत नाही. मला सिंदूर लावयाला अवडतं म्हणून मी लावते…’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.

अक्षय कुमारसोबत इंटिमेट सीन – ‘खिलाडियो का खिलाडी’ सिनेमात रेखा – अक्षय कुमार यांनी अनेक इंटिमेट सीन दिले होते. ज्यामुळे रेखा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या होत्या. याचदरम्यान, रेखा आणि अक्षय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण यामागचं सत्य अद्याप समोर आलेलं नाही.