
Ranpati Shivray : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांनी देखील त्यांना महाराजांच्या भूमिकेत डोक्यावर घेतलं. ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ यांसारख्या सिनेमांमधील “गड आला, पण सिंह गेला” आणि “आपण रायगड जिंकणार” यांसारखे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात कोरले गेले आहेत. पण आता लवकर प्रदर्शित होत असलेल्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमा मांडलेकर महारांज्या भूमिकेत दिसणार आहे. तर आता महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.
सांगायचं झालं तर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या अनेक सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसले. पण मध्यंतरी त्यांच्या मुलाच्या नावाच्या झालेल्या वादावरून चिन्मय यांनी यापुढे महाराजांची भूमिक साकारणार नसल्याचा निर्णय घोतला. याच कारणामुळे लांजेकर यांनी अभिजीत श्वेतचंद्र याची निवड केली.
यावर लांजेकर म्हणाले, ‘अभिजीत याने याआधी माझ्यासोबत जवळपास 4 सिनेमांमध्ये काम केलं. त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि आमच्या टीमच्य कार्याबद्दलचा त्याचा आदर… फक्त शब्दातून नाही तर, त्याच्या कृतीतून सुरु आहे… तो डोंबिवलीत राहतो आणि पुण्याता रिहर्सलला यतो. ज्यासाठी जवळपास दोन ते अडीच तास लागतात.’
पुढे लांजेकर म्हणाले, ‘भूमिकेसाठी त्याची वेगवेगळ्या पद्धतीने जवळपास 10 – 12 लूक टेस्ट झाल्या. AI चा वापर करुन दाढी – मिशी सर्व लूकटेस्ट पुणे – मुंबईत झाल्या. या सगळ्यात तो न चुकता हजर राहत होता . हे सगळ काही तो, त्याचं घरदार सोडून… चालू असलेल्या मालिकेतून वेळ काढून तो करत होता… एक क्षण असा आला जेव्हा त्याने मालिका सोडून दिली..’ असं देखील दिग्पाल लांजेकर म्हणाले. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.