AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dil De Diya : ‘दिल दे दिया’ गाणं प्रदर्शित!, जॅकलिन आणि सलमान खानचा ऑनस्क्रिन जलवा

राधे चित्रपटातील 'दिल दे दिया' हे गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. ('Dil De Diya' song released !, Jacqueline and Salman Khan's onscreen Chemistry)

Dil De Diya : 'दिल दे दिया' गाणं प्रदर्शित!, जॅकलिन आणि सलमान खानचा ऑनस्क्रिन जलवा
| Updated on: Apr 30, 2021 | 2:57 PM
Share

मुंबई : सलमान खानच्या (Salman Khan) ‘राधे’ (Radhe) या चित्रपटातील बहुप्रतिक्षित डान्स नंबर ‘दिल दे दिया’ (Dil de diya) आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पॉवर-पैक डान्स ट्रॅकमध्ये सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस झळकले आहेत. रिलीज होताच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. (‘Dil De Diya’ song released !, Jacqueline and Salman Khan’s onscreen Chemistry)

जॅकलिन आणि सलमानच्या दोडीला पसंती

दिशा पाटनी आणि सलमान खान प्रमाणेच जॅकलिन आणि सलमान खान यांची सिझलिंग केमेस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शिवाय हे गाणं आपल्या तालावर थिरकायला लावणारं ठरतंय.

पाहा गाणं (Song Release)

जॅकलिननं व्यक्त केल्या भावना

या डान्सनंबर विषयी जॅकलिननं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सलमानसोबत काम करण्याचा अनुभव सर्वोत्तम असतो. त्याची एनर्जी दमदार असते. ‘राधे’मधील ‘दिल दे दिया’ माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं माझ्या आतापर्यंतच्या डान्स नंबरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. सोबतच, डान्सिंग स्टार प्रभुदेवा सरांसोबत काम करणे हा एक जबरदस्त अनुभव होता. आम्ही या गाण्याच्या शूटिंगदरम्यान खूप धमाल केलीये. मला यात काम करण्याची प्रचंड इच्छा होती.’

हिमेश रेशमिया यांनी दिलं संगीत

हिमेश रेशमियानं या गाण्याला संगीत दिलं असून शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. हे गाणं, कमाल खान आणि पायल देव यांनी गायलं असून शबीना खाननं कोरियोग्राफ केलं आहे.

अनेक दिग्गज कलाकार झळकणार 

सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर ‘पे-पर-व्यू’ सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

Photo : गोपी बहूचा ग्लॅमरस लूक, बॅक ड्रेसमध्ये दिसला कातिलाना अंदाज

Photo : तमन्ना भाटियाचा बॅकलेस ड्रेसमध्ये कातिलाना अंदाज, फॅन्स म्हणाले, ‘ये दिल तेरे लिये ही धडकता हैं!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.