
फराह खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. यूट्यूब ब्लॉगिंगमध्ये ती चांगलीच व्यस्त दिसत आहे. तिचा कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होताना दिसतात. चाहत्यांना त्यांची मस्करी आणि स्वयंपाकाची शैली खूप आवडते. विशेष म्हणजे मोठं मोठ्या कलाकारांच्या घरी जाऊन फराह खान आणि दिलीप जेवण बनवतात. फराह खानने दीड वर्षांपूर्वी तिचे यूट्यूब चॅनल लाँच केले आणि व्लॉग तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फराह एकटी व्लॉग तयार करायची, तिच्या स्वयंपाकी दिलीपलाही तिच्या व्लॉगमध्ये दिसण्यास सुरूवात झाली. आज तिचे यूट्यूबवर 25 लाख सबस्क्राइबर आहेत. यातून तगडा पैसा फराह खान कमावते. फराहने एका पॉडकास्टमध्ये YouTube ब्लॉगिंगमधून मिळालेल्या कमाईचा खुलासा केला आहे.
फराह खान म्हणाली की, मी खूप जास्त पैसे कमावत आहे. इतके चित्रपट दिग्दर्शित करूनही, मी एकाच वर्षात कदाचित माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही इतके पैसे कमवले नाहीत. फराह खान हिच्यासोबत तिच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये दिसणारा तिचा कूक दिलीप यालाही मोठे पैसे देते. यासोबतच फराह खानने दिलीपचे सर्व कर्जही फेडून टाकले आहे. कारण या चॅनलमध्ये जितके फराह खानचे योगदान आहे, तितकेच दिलीपचे देखील.
फराह खानने स्पष्ट केले की, ती दिलीपचे जीवन सुधारत आहे आणि तो चांगला उदरनिर्वाह करत आहे. मी आता त्याच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवते. मी त्याच्या एका मुलाला स्वयंपाक कौशल्याच्या डिप्लोमा कोर्समध्येही प्रवेश दिला. हेच नाही तर दिलीपवर खूप जास्त कर्ज होते. ते फेडण्यासाठी आमचे एक वर्ष गेले. हेच नाही तर त्याच्या गावाकडे दिलीपचे चांगले मोठे घर बनत आहे.
हेच नाही तर दिलीपला जास्त पैसा मिळाला, याकरिता मी त्याला अनेक ब्रँडना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच फराह खानच्या चॅनलवरून दिलीप हा आपले गावाकडचे घर दाखवताना देखील दिसला होता. आतापर्यंत अनेक मोठं मोठ्या व्यक्तींच्या घरी जाऊन दिलीपने पदार्थ बनवली. दिलीपला एक वेगळी ओळख फराह खानमुळे नक्कीच मिळाली आहे. तो काही जाहिराती देखील करतो.