
साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री गेल्या काही वर्षांमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. यामध्ये मल्याळम सिनेमांचा असलेला योगदार देखील महत्त्वाचा ठरला आहे. तर, बॉलिवूड साऊथ इंडियन इंडस्ट्रीप्रमाणे खऱ्या घटनांवर आधारित सिनेमे तयार करत प्रेक्षकांना स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे प्रेमालू, आवेशम, अट्टम यांच्या सिनेमांने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एवढंच नाही तर, गेल्या काही दिवसांमध्ये मल्याळम सिनेमा देखील यशाकडे वाटचाल करताना दिसत आहे. यावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय मल्याळम सिनेमाच्या यशाचं कारण आणि रहस्य काय? यावर देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राम गोपल वर्मा यांनी सिनेमांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘फक्त अशा काही बॅक टू बॅक सिनेमांची गरज असते, ज्यांची प्रेक्षकांनी आपेक्षा देखील केलेली नसते. जेव्हा मी विजयवाडा याठिकाणी इंजीनियरिंग करत होतो तेव्हा आम्ही कधी मल्याळम सिनेमे पाहायचो देखील नाही. कारण इतर इंडस्ट्रीच्या सिनेमांच्या तुलनेत मल्याळम सिनेमांमध्ये सेक्स सीन अधीक असायचे. मल्याळम सिनेमा म्हणजे सेक्स सिनेमा असं समिकरण तयार झालं होतं. पण आता मल्याळम सिनेमा देखील चांगलं काम करत आहे..’
‘मल्याळम इंडस्ट्रीमध्ये चांगले सिनेमे नव्हते असं नाही. त्याकाळी डिस्ट्रिब्यूटर्स देखील त्याच प्रकारच्या सिनेमांना दुजोरा देत होते. प्रभावित करण्यासारखी अनेक कारणं होती. सिनेमा कुठला आणि कसा आहे… यावर देखील विचार करणं फार महत्त्वाचं असतं.’ पुढील 10 वर्षांमध्ये सिनेमा कुठे पोहोचेल? असा प्रश्न देखील राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आला.
यावर राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘गोष्टी फार झपाट्याने बदलत आहेत. पुढच्या 6 महिन्यांमध्ये काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे पुढच्या 10 वर्षांबद्दल सांगणं फार कठीण आहे… इंडस्ट्रीमध्ये अनेक गोष्टी बदलत आहेत ‘बाहुबली’ सिनेमांसारखे बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांचा दृष्टीकोन बदलत आहेत.’
एवढंच नाही तर, तेलुगू सिनेविश्वातील लिडिंग स्टार राम चरण, प्रभास यांनी देखील वर्मा यांचं लक्ष वेधलं. ‘या सेलिब्रिटींना ज्याप्रकारे स्टारडम आणि लोकप्रियता मिळाली, ती पूर्वी कोणाला मिळाली नाही. बॉलिवूड कलाकारांना देखील त्यांनी मागे टाकलं आहे.’ असं देखील राम गोपाल वर्मा म्हणाले.