प्रियांका चोप्रा हिच्याकडे दिग्दर्शकाची थेट ‘ही’ डिमांड, खळबळजनक खुलासा

प्रियांका चोप्रा हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच धक्कादायक खुलासा केला. इतकेच नाही तर तिने बाॅलिवूडमधील थेट काळे सत्य सांगितले. ज्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

प्रियांका चोप्रा हिच्याकडे दिग्दर्शकाची थेट 'ही' डिमांड, खळबळजनक खुलासा
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 5:11 PM

मुंबई : प्रियांका चोप्रा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. धमाकेदार भूमिका करताना प्रियांका चोप्रा ही दिसली. मात्र, करिअरचा सुरूवातीचा काळ प्रियांका चोप्रा हिच्यासाठी अजिबातच सोपा नव्हता. कधी तिच्या रंगामुळे तर कधी तिच्या उंचीमुळे तिची खिल्ली उडवली गेली. आता नुकताच प्रियांका चोप्रा हिच्याबद्दल एका दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला. थेट या दिग्दर्शकाने प्रियांका चोप्रा हिच्याकडे अत्यंत मोठी मागणीच केली. या दिग्दर्शकाचा खुलासा ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

नुकताच दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी खळबळजनक विधान केले. सुनील दर्शन म्हणाले की, मी प्रियांका चोप्रा हिला पहिल्यांदाच बघितले, त्यावेळी मी तिला थेट तिचे नाक ठीक करण्याचा सल्ला दिला. सुनील हे पुढे म्हणाले की, ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्रियांका चोप्रा हिला बघितले त्यावेळी ती अजिबातच सुंदर दिसत नव्हती.

फक्त अवघ्या 15 मिनिटांमध्येच त्यांनी ठरवले की, ते प्रियांका चोप्रा हिला कास्ट करणार. सुनील दर्शन म्हणाले की, प्रियांका चोप्रा हिचे डोळे इतके जास्त जबरदस्त होते की, मी लगेचच कास्ट केले. परंतू मी लगेचच तिला म्हटले की, अगोदर तुझे नाक ठिक करून घे. आता सुनील दर्शन यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

इतकेच नाही तर काही लोक हे सतत सुनील दर्शन यांना खडेबोल सुनावताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगितले. अनेक गंभीर आरोप हे प्रियांका चोप्राने बाॅलिवूडवर केले. प्रियांका चोप्रा ही विदेशात आपल्या कुटुंबियांसोबत राहते. प्रियांका चोप्रा ही सध्या हाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसतंय.

प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच मुलगी मालती मेरी हिच्यासोबतचे अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये आपल्या मित्रांसोबत धमाल करताना मालती ही दिसत होती. इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा ही नेहमीच मुलगी मालती हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.