Priyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण

प्रियांका चोप्राने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या होमवेअर ब्रँडबद्दलची माहिती दिली आहे. परंतु वस्तूंच्या किमती ऐकताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

Jul 03, 2022 | 2:53 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jul 03, 2022 | 2:53 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा कधी तिच्या अभिनयातील व्यावसायिक आयुष्यामुळे तर कधी सामाजिक प्रश्नावर भाष्य केल्याने चर्चेत असलेली दिसून आली आहे. मात्र यावेळी प्रियांका नवीन कारणामुळे चर्चेत आली आहे

1 / 6
वास्तविक प्रियांकाने नुकताच तिचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. रेस्टॉरंटनंतर, तिने होमवेअर ब्रँड लॉन्च केला आहे, ज्याची किंमत ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. अत्यंत हायफाय असलेल्या होमवेअर ब्रँडमध्ये अनेक आकर्षक पद्धतीची वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.

2 / 6
देसी गर्ल प्रियांकाच्या नव्या कंपनीचे नाव 'सोना होम' आहे, ज्यामध्ये विकल्या गेलेल्या वस्तूंची किंमत जाणून लोक हैराण झाले आहेत. होमवेअर ब्रँडमध्ये 5 हजार रुपयांचा एक काप विकला गेला आहे.

3 / 6
 कप सोडा, प्रियांका चोप्रा देखील 500 किंवा 1 हजारांना नाही तर 6 हजारांना प्लेट्स विकते आहे.सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचे झालेतर एवढ्या पैश्यात स्थानिक बाजारातून दोन डिनर सेट विकत घेता येतील,मात्र तिच्या एवढ्या महाग प्लेटची खासियत नक्कीच वेगळी असणार.

4 / 6
 तुम्ही प्रियांकाच्या होमवेअर ब्रँडमध्ये टेबल कव्हरसारखी स्वस्त वस्तू मिळवण्याचा विचार करत असाल तर 30 हजार रुपये खर्च करण्यासाठी सज्ज व्हा.

5 / 6
प्रियांका चोप्राने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या होमवेअर ब्रँडबद्दलची माहिती दिली आहे. परंतु वस्तूंच्या किमती ऐकताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.सोशल मीडियावरील युझर्सने तिला 'एवढी छोटी गोष्ट कोणी एवढ्या महागात कशी विकू शकते'असे म्हणत तिला ट्रोल केले आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें