AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीचं निधन, मृत्यूचं कारण थक्क करणारं, सिनेविश्वात शोककळा

धक्कादायक... बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीने घेतला अखेरचा श्वास, निधनाचं कारण जाणून बसेल तुम्हालाही धक्का... . सेलिब्रिटीच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र सेलिब्रिटीच्या निधनाची चर्चा...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीचं निधन, मृत्यूचं कारण थक्क करणारं, सिनेविश्वात शोककळा
| Updated on: Oct 15, 2023 | 11:02 AM
Share

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सेलिब्रिटीच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सेलिब्रिटीच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध सेलिब्रिटीला श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्द सिने लेखक आणि दिग्दर्शक रवींद्र पीपट (Ravindra Peepat) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. रवींद्र पीपट यांनी बॉलिवूड अनेक सिनेमांचं लेखण आणि दिग्दर्शन केलं. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही.

रिपोर्टनुसार, रवींद्र पीपट कर्करोगाने देखील ग्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. रवींद्र पीपट यांची लोकप्रियता ‘वारिस’ सिनेमामुळे वाढली. ‘वारिस’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रवींद्र पीपट यांच्या खांद्यावर होती. ‘वारिस’ सिनेमात स्मिता पाटील, राज बब्बर, अमृता सिंग यांसारखे सेलिब्रिटी होते. ‘वारिस’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात देखील घर केलं.

एवढंच नाही तर, दिग्दर्शक रवींद्र पीपट दिग्दर्शित ‘लावा’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री डिंपल कपाडिया, आशा पारेख आणि राज बब्बर यांसारखे दिग्गज चाहत्यांच्या भेटीस आले. रवींद्र पीपट यांनी रणधीर कपूर, पूनम ढिल्लन स्टारर ‘बीवी ओ बीवी’ या सिनेमाची पटकथा देखील लिहिली आहे. अशात त्यांच्या निधनामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

फक्त बॉलिवूड नाही तर, पंजाबी सिनेविश्वात देखील रवींद्र पीपट यांनी काम केलं आहे. रवींद्र पीपट यांनी ‘पंजाब बोल्दा’ या पंजाबी सिनेमाचं देखील दिग्दर्शन केलं. 2012 मध्ये त्याने नीरू बाजवासोबत ‘पता नहीं रब कहदियां रंगन च राजी’ दिग्दर्शित केला होता. याशिवाय ‘कैद में है बुलबुल’ आणि ‘घर आया परदेसी’ यांसारख्या सिनेमांमुळे रवींद्र पीपट यांची ओळख निर्माण झाली.

टीव्ही मालिकांसाठी देखील केलं दिग्दर्शन

रवींद्र पीपट यांनी टीव्ही मालिकांसाठी देखील दिग्दर्शन केलं आहे. १९९५ मध्ये टेलीकास्ट झालेल्या ‘वंश’ मालिकेचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. याशिवाय, ‘काश आप हमारे होते’, ‘अपनी बोली अपना देश’ या मालिकांसाठी देखील रवींद्र पीपट यांनी दिग्दर्शन केलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?