
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांच्या सारखी दिसणारी व्यक्तीही चर्चेत असते. बॉलिवूडचे तीन खान शाहरुख, सलमान आणि आमिरसारखे दिसणारे काही जण आहेत. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसारखा दिसणारा एक व्यक्ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. तो आपले फोटो शेअर करत असतो.

शाहरुख खान सारखा दिसणारा व्यक्ती लाखोंची कमाई करत असताना, आमिरसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला काम मिळणं खूप अवघड झालं आहे. ज्यामुळे त्याला जगण्यात अडचण येतेय.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत देवाशीष म्हणाले होते की बरेच दिग्दर्शक आधी मला काम देण्यास होकार देतात मात्र नंतर नकार देतात कारण मी आमिर खानसारखा दिसतो. मला फक्त आमिरची नक्कल करण्याचं काम मिळतं.

आमिर वर्षात एक चित्रपट घेऊन येतो, ज्यामुळे त्याची कॉपी करण्याचं काम कमी होतं.

देवाशीष सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि त्यानं आमिर खानला भेट दिली आहे. त्यानं आमिरसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.