अनेक पुरुष आजही माझ्याकडे…., 47 व्या वर्षी देखील का सिंगल आहे अभिनेत्री? स्वत:च सांगितलं कारण
बॉलिवूडमध्ये अशी एक प्रसिद्ध अभिनेत्री जिने अनेक सुपरहीट चित्रपट दिले. पण ती वयाच्या 47 व्या वर्षीही अविवाहितच आहे. तिने तिचे लग्नाबाबतचे आणि ती अविवाहित असण्याबाबतचे विचारही मांडले आहेत.
बॉलिवूडमध्ये अफेअर, ब्रेकअप, घटस्फोट या गोष्टी जेवढ्या सामन्य आहेत तेवढंच सामान्य आहे ते म्हणजे लग्न न करणे. बॉलिवूडमध्ये अनेक असे अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न केलं नाही. यातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचाही समावेश आहे. जिने बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख बनवली आहे पण वयाच्या 47 व्या वर्षीही देखील ही अभिनेत्री आजही सिंगलच आहे. त्याची तिची अशी काही कारण आहेत.
ही प्रसिद्ध आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता. दिव्याने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. ती 47 वर्षांची आहे आणि अविवाहित आहे. तिने सांगितले की तिचे मित्र तिला अनेकदा विचारतात की ती अविवाहित का आहे आणि अभिनेत्रीकडे याचे एकच उत्तर आहे.
लग्नाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री
दिव्या दत्ताने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिने तिच्या लग्नाबद्दल तिचे विचार मांडले. ती म्हणाली, ‘जर तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळाला तर ते खूप छान आहे. जर नसेल तर आयुष्य अजूनही सुंदर आहे’.
अजूनही अविवाहित का आहे?
दिव्या दत्ता पुढे म्हणाली की, ‘वाईट वैवाहिक जीवनात राहण्यापेक्षा स्वतःची स्वत: काळजी घेणे कधीही चांगले. नातेसंबंधात स्वतःला कमी लेखण्याऐवजी, स्वतःवर प्रेम करणे चांगले आहे’. अभिनेत्री म्हणाली की, बरेच पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात आणि तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. जे तिला आवडतंही परंतु जेव्हा तुम्ही एकमेकांशी जोडले जाऊ शकता तेव्हाच नाते तयार झाले पाहिजे. असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे ती या सर्व गोष्टींना हवं तेवढं गांभीर्याने घेत नाही.
दिव्या म्हणाली- ‘तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती तुमचा हात धरू शकते. जर तसं नसेल तर माझ्या आजूबाजूला खूप गोड मित्र आहेत आणि मी स्वतःसाठीही आहे कारण मी खूप चुकीचे हात धरले आहेत… यातूनच मग तुम्ही शिकता’.
दिव्या दत्ता यांनी जीवनसाथी शोधण्यावर भाष्य केले
दिव्या दत्ता पुढे म्हणाली की, ‘आयुष्यात ट्रायल अँड एररमधून शिकायला मिळते. मी खूप कौटुंबिक चित्रपट केले आहेत आणि लग्न आणि करवा चौथचा अनुभव आला आहे पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही बाहेर परिपूर्णता शोधता जी आवश्यक नसते. तुम्ही हे देखील शिकता की एक चांगला जीवनसाथी तुमच्या आयुष्यात येईलच असे नाही. तुम्ही स्वतःमध्ये परिपूर्णता शोधा, मग कोणीतरी येऊन त्या गोष्टीची कदर करू शकतं’.