Divyanka Tripathi : मेरे करण-अर्जुन आ गए… टीव्हीची लाडकी नायिका झाली आई, शेअर केली डबल गुड न्यूज

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या 10 वर्षानंतर दुहेरी आनंद साजरा होत आहे. विवेकने सोशल मीडियावर "द बॉईज" आले असल्याची गोड बातमी दिली, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इशिता भल्ला म्हणून लोकप्रिय असलेली दिव्यांका आता जुळ्यांची आई बनली असून त्यांचे कुटुंब पूर्ण झाले आहे.

Divyanka Tripathi : मेरे करण-अर्जुन आ गए... टीव्हीची लाडकी नायिका झाली आई, शेअर केली डबल गुड न्यूज
दिव्यांकाने दिली डबल गुड न्यूज
| Updated on: May 26, 2026 | 3:36 PM

Divyanka Tripathi : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि लाडकी सून, इशिता भल्ला अर्थात दिव्यांका त्रिपाठीच्या घरी सध्या डबल सेलिब्रेशन सुरू आहे. दिव्.यांका वयाच्या 41 व्या वर्षी आी झाली असून तिने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. काही काळापूर्वीच अभिनेत्रीने दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया, या दोघांनी गरोदरपणाची घोषणा केली आणि लवकरच एका नवीन सदस्याचे आगमन होणार असल्याचे सांगितलं होतं. लग्नाच्या जवळपास 10 वर्षांनंतर दिव्यांका आणि विवेक दहिया यांनी जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. अभिनेत्रीने दोन मुलांना जन्म दिला आहे. तिने नुकतेच तिचे मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं होतं.

विवेक दहियाने सोशल मीडिया अकाऊंटवरून दोन मुलांच्या जन्मांची डबल गुज न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. ” अखेर प्रतीक्षा संपली… “The Boys” आलेत, आणि आयुष्य पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर वाटत आहे. मेरे करण-अर्जुन आ गए.. मी आणि दिव्यांका, आता पालकत्वाच्या या अद्भुत नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची गरज आहे.”अशा गोड शब्दांत त्याने ही न्यूज सर्वांना सांगितली.

दिव्यांकाने जुळ्या मुलांना दिला जन्म

विवेक दहियाने ज्या पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे, ती पोस्टसुद्धा खूपच गोड आहे. त्या पोस्टमध्ये त्याने निळ्या रंगाचे कपडे घातलेल्या दोन मुलांचा फोटो दाखवला असून हे, “आम्ही देवाकडे आनंद मागितला, आणि तो म्हणाला, ‘दुप्पट घ्या.’ Blessed with Twin Boys.. असं त्या पोस्टवर लिहीलंय.

विवेक दहिया याची पोस्ट 

 

दिव्यांका आणि विवेक यांनी सहा महिनमे झाल्यानंतर गरोदरपणाची घोषणा केली. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनमध्ये नवा पाहुणा घरी येईल, असं सांगितलं होतं. दिव्यांका तिच्या गरोदरपणाचा पुरेपूर आनंद घेत असल्याचं अनेक फोटोंतून दिसून आलं. तिचं डोहाळेजेवण अर्थात बेबी शॉवरही काही काळापूर्वी थाटामाटत झालं होतं. तिथे विवेक आणि दिव्यांकावर मित्र आणि कुटुंबीयांकडून प्रेमाचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला. आता त्यांचं चौकौनी कुटुंब पूर्ण झालं असून दिव्यांका 1 नव्हे तर दोन, जुळ्या मुलांना जन्म दिलाय.

दिव्यांका- विवेकचं लग्न

हिंदी मालिकांमधील लाडकी अभिनेत्री, अनेक मालिकांमधील लाडकी सून, म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी 8 जुलै 2016 साली लग्न केलं. भोपाळमध्ये संपूर्ण पारंपरिक रितीरिवाजांसह त्यांचा विवाह पार पडला. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवर दिव्यांका आणि विवेक यांची भेट झाली होती. मालिकेत त्यांचे नाते फक्त एका छोट्याशा ‘हॅलो’पुरतेच मर्यादित असले तरी, एका सहकलाकाराने पुढाकार घेऊन त्यांची जोडी जमवली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि अखेरीस त्यांनी लग्न केले. आता ते दोन जुळ्या मुलांचे पालक झालेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us