
टीव्ही इंडस्ट्रीचं सुप्रसिद्ध नाव असलेली दिव्यांका त्रिपाठी या वेळी 'खतरों के खिलाड़ी 11' या स्टंट बेस्ड रिअॅलिटी शोची स्पर्धक बनली आहे. ती आपल्या सर्व सहकारी स्पर्धकांसह दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये पोहोचली आहे, तिथून ती सतत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

हॉटेल रूममधील मॉर्निंक टीपासून ते बीचवर मित्रांसोबत मस्तीपर्यंत बरेच फोटो दिव्यांकानं शेअर केले आहेत.

यासह दिव्यंका हा शो जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दिव्यांकाने केपटाऊनमधील भटकंतीचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दिव्यांका विशाल आदित्य सिंग, श्वेता तिवारी, राहुल वैद्य आणि वरुण सूदसोबत मस्ती करताना दिसत आहे.

नेहमीप्रमाणे या वेळीही शोमध्ये धोकादायक स्टंट असतील जे स्पर्धक कमी वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.