
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी रात्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सुरुवातीच्या अहवालात शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने सांगितलं जात आहे. परंतू तिच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, ज्या डॉक्टरांकडे शेफाली उपचार घेत होती. त्यांनी अभिनेत्रीबद्दल मोठी माहिती दिली आहे. अभिनेत्री सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती… असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
शेफाली जरीवाला हिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी टीव्ही9 ला दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी शेफाली जरीवाला हिच्यावर उपचार सुरु होते. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून शेफाली हिच्यावर उपचार सुरु होते. शेफाली जरीवाला व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन औषधांचे डोस घेत होती. दोन्ही डोस काही महिन्यांच्या फरकाने घेतला जातो. अभिनेत्रीवर सातत्याने उपचार सुरु होते. पण या उपचारांचा तिच्या प्रकृतीवर परिणाम होईल असा काहीही संबंध नसल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. शिवाय शेफाली ज्या डॉक्टारांकडून उपचार घेत होती ते नामवंत डॉक्टर आहेत.
शेफाली जरीवाला तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. एवढंच नाहीतर, तिला दुसरे कोणते आजार नव्हते… शेफालीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले हे आमच्यासाठी देखील अत्यंत धक्कादायक… असं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेफालीच्या निधनाची चर्चा सुरु आहे.
ज्या परिसरात शेफाली राहत होती, त्याठिकाणी पोलिसांचं पथत तैनात करण्यात आलं आहे. शेफाली राहत असलेल्या गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये फॉरेन्सिक टीम आणि पोलिस रात्रीपासून तपास करत होते. फॉरेन्सिक टीम काही दस्तवैजासहित थोड्याच वेळापूर्वी निघून गेली आहे.
शिवाय अभिनेत्रीचं निधन झाल्यानंतर पती पराग त्यागी आणि त्याच्यासह इतर सहा जणांचे देखील जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. शुक्रवारी रात्री 10.30 पर्यंत अभिनेत्रीची प्रकृती स्थिर होती. पण अचानक अभिनेत्रीच्या छातीत दुखू लागल्यामुळे अभिनेत्रीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने शेफालीचं निधन सांगितलं जात आहे. परंतू तिच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.