AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: फक्त 12 दिवसांत छापले 500 कोटी रुपये; ‘दृश्यम’चा चौथा भाग येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं..

या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विजय साळगावकर या व्यक्तिरेखेभोवती फिरणाऱ्या कथेला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Drishyam 3: फक्त 12 दिवसांत छापले 500 कोटी रुपये; 'दृश्यम'चा चौथा भाग येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं..
अजय देवगण, तब्बू, जयदीप अहलावतImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2026 | 8:47 AM
Share

Drishyam 3: अभिनेता अजय देवगण याच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या 12 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. मात्र, चित्रपटाला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद पाहून चाहत्यांना आता चौथ्या भागाची उत्सुकता लागली आहे. अशातच दिग्दर्शक अभिषेक पाठकने  ‘दृश्यम 4’बाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

‘दृश्यम 4’ येणार की नाही?

‘दृश्यम 3’च्या यशानंतर या फ्रँचायझीचा पुढील भाग कधी येणार, असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे. मात्र, दिग्दर्शक अभिषेक पाठकच्या मते, सध्या चौथ्या भागाची योजना नाही. त्याच्या मते, ‘दृश्यम’ ही केवळ लोकप्रिय फ्रँचायझी असल्यामुळे तिचे आणखी चित्रपट बनवण्याची मालिका नाही. प्रत्येक भागासाठी दमदार आणि योग्य कथा असणं आवश्यक आहे. अभिषेकने ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिसऱ्या भागात या कथेचा प्रवास योग्य टप्प्यावर संपला आहे. चित्रपटाचा शेवट भावनिक आणि अर्थपूर्ण असल्याचं त्याचं मत आहे. त्यामुळे केवळ प्रेक्षकांची मागणी आणि बॉक्स ऑफिसवरील यश पाहून चौथा भाग बनवणं योग्य ठरणार नाही.

अभिषेक पाठकने ‘दृश्यम 3’च्या शेवटाबाबतही महत्त्वाचं भाष्य केलं. त्याच्या मते, चित्रपटाचा शेवट अशा पद्धतीने करण्यात आला आहे की, प्रेक्षकांना संपूर्ण प्रवासाची भावनिक जोड अनुभवता येते. हा शेवट फ्रँचायझीला दिलेल्या प्रेमपत्रासारखा असल्याचं त्याने म्हटलं आहे. काही प्रेक्षकांना या कथेत आणखी अनेक वळणं जोडता येतील, असं वाटत असलं तरी प्रत्येक कथेचा कधीतरी शेवट व्हायला हवा. अभिषेकला ही गोष्ट मान्य आहे की, भविष्यात आणखी कथा तयार करण्याची शक्यता असू शकते. मात्र, सध्याच्या चित्रपटाचा शेवट योग्य असल्याने त्यात विनाकारण बदल करण्याची त्याची इच्छा नाही.

12 दिवसांत 500 कोटींचा टप्पा पार

‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ने कमाईच्या बाबतीतही मोठी झेप घेतली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात सुमारे 501.80 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली. भारतातील निव्वळ कमाई 323.50 कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 62 कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यातही चित्रपटाने दमदार कामगिरी केली. दुसऱ्या वीकेंडमध्ये 60 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाल्याने चित्रपटाच्या यशाला आणखी बळ मिळाले. अजय देवगणच्या कारकिर्दीतील जगभरात 500 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

Follow Us
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...