अभिनेता एजाज खानच्या अडचणी वाढल्या; थेट एफआयआर दाखल

एजाज खानच्या "हाउस अरेस्ट" या शोमधील अश्लील दृश्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या शोची टीका झाल्यानंतर एजाज खानविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. हा शो अश्लीलतेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

अभिनेता एजाज खानच्या अडचणी वाढल्या; थेट एफआयआर दाखल
Ejaz Khan Faces FIR for Obscene Content
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2025 | 9:33 PM

एजाज खान आपल्या ‘अरेस्ट हाउस’ या रियालिटी शोमुळे वादात सापडला आहे. या शोचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये स्पर्धक अश्लील कृत्ये करताना दिसत आहेत. यावर तेव्हापासून अनेक टीका केली जात आहे. त्यामुळे उल्लू या ओटीटी ॲपचा शो ‘हाउस अरेस्ट’मोठ्या अडचणीत सापडला आहे.

शोवर बंदी घालण्याची मागणी

नुकताच प्रदर्शित झालेल्या भागानंतर अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या शोवर अश्लील कंटेन्ट दाखवल्याचा आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. या शोवर बड्या नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकजण सडकून टीका केली आहे. तसेच या शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती.

अभिनेता एजाज खानविरोधात अखेर एफआयआर दाखल

अभिनेता एजाज खानविरोधात अखेर एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. एजाज खानच्या वादग्रस्त शो House Arrest चा निषेध करत, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे गौतम कांजी रावरिया यांनी अभिनेता एजाज खान, निर्माते राजकुमार पांडे आणि उल्लू डिजिटल यांच्याविरुद्ध अंबोली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केले आहे.

अंबोली पोलिसांनी एजाज खान आणि त्याच्या शोशी संबंधित दोन लोकांविरुद्ध बी.एन.एस. 2023 – 296, 3 (5), 67, 67अ, 4, 6,7 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शोबाबत खासदार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आवाज उठवला 

खासदार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या या‘हाउस अरेस्ट’ या रियालिटी शोमधील अश्लीलतेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, त्यांनी हा मुद्दा संसदेच्या स्थायी समितीमध्येही उपस्थित केला. त्यामुळे ‘हाउस अरेस्ट’ शोने पुन्हा एकदा अश्लील कंटेन्ट दाखवण्याच्या मुद्द्याला राष्ट्रीय चर्चेत आणलं आहे. अखेर याबाबत आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.


नक्की शो काय? आणि शोमधी ती व्हायरल झालेला व्हिडीओ…

‘हाउस अरेस्ट’ हा शो बिग बॉस रियालिटी शोच्या फॉरमॅटमध्ये बनवला गेला आहे. यात सहभागींना एका घरात बंद केले जाते, जिथे ते कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली राहतात. नुकताच शोच्या काही व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, ज्यात स्पर्धक कॅमेऱ्यासमोर सेक्सच्या पोझिशन समजावताना आणि कपडे काढण्याच्या स्पर्धेत भाग घेताना दिसत आहेत. यापैकी काहींनी आपली पँट आणि काहींनी ब्रा काढली, ज्यामुळे शोवर अश्लीलता पसरवल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.