Box Office गाजवायला येतोय ‘The Dirty Picture 2’, ‘सिल्क’च्या भूमिकेत विद्या बालन की…
Ekta Kapoor On The Dirty Pictures 2: १५ वर्षांपूर्वी 'द डर्टी पिक्चर' प्रदर्शित झाला होती, हा चित्रपट हिट ठरला होता, आता या चित्रपटाचा भाग दोन येणार असून त्यात कोणती अभिनेत्री काम करणार आहे असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

The Dirty Pictures 2: २०११ साली प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता. मिलन लुथरिया दिग्दर्शित हा चित्रपट सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित होता. विद्या बालनने यात मुख्य भूमिका साकारली होती, तर तिच्यासोबत नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी आणि तुषार कपूर यांनीही काम केले होते. आता याच चित्रपटाचा भाग दोन येणार असल्याची घोषणा टिव्ही क्विन निर्माती एकता कपूरने केली आहे.
निर्माती एकता कपूरने खुलासा केला आहे की, ‘द डर्टी पिक्चर’ हा हिट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १५ वर्षांनी ती त्याचा सिक्वेल बनवण्याचे प्लॅनिंग सुरु आहे. विद्या बालन, नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी आणि तुषार कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. प्रेक्षकांनी या चित्रपटावर खूप प्रेम केले.
View this post on Instagram
एकता कपूर अलीकडेच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर आली होती, जिथे तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चा केली. एकताने स्पष्ट केले, “मी सध्या ज्या चित्रपटाची तयारी करत आहे तो एक मोठा चित्रपट आहे, ‘द डर्टी पिक्चर’, ज्याचा पहिला भाग १५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता, मी ‘द डर्टी पिक्चर २’ ची योजना आखत आहे, ज्यासाठी माझ्याकडे एक रंजक सिक्वेल कथा आहे, जी मला प्रेक्षकांसमोर आणायची आहे.”
एकता कपूरच्या या घोषणेमुळे ‘द डर्टी पिक्चर २’ बद्दल बरीच चर्चा आणि चाहत्यांची उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘द डर्टी पिक्चर २’ मध्ये पूर्वीचेच कलाकार असतील की नाही, याबद्दल एकताने काहीच माहिती दिली नाही. शिवाय, या सिक्वेलमध्ये विद्या बालनच्या जागी नवीन अभिनेत्री असेल का? असाही प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पहिल्या भागात विद्या बालनच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले.
बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार, २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ८० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती, तर त्याची जगभरातील कमाई सुमारे ११७ कोटी रुपये होती. अशाप्रकारे, हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या सुपरहिट ठरला.
