Emraan Hashmi : मुंबईत भव्य बंगला तर गोव्यात पेंट हाउस अन्…, इमरान हाशमी अफाट श्रीमंत, नेटवर्थ जाणून डोळे विस्फारतील

Emraan Hashmi Net Worth: बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अभिनेता त्याच्या संपत्तीमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याची फक्त मुंबईतच नाही तर, गोवा आणि लोनावळ्यात देखील गडगंज संपत्ती आहे. एवढंच नाही तर, इमरानच्या गॅरेजमध्ये कारचं देखील मोठं कलेक्शन आहे.

Emraan Hashmi : मुंबईत भव्य बंगला तर गोव्यात पेंट हाउस अन्..., इमरान हाशमी अफाट श्रीमंत, नेटवर्थ जाणून डोळे विस्फारतील
Emraan Hashmi
| Updated on: Aug 11, 2026 | 1:41 PM

Emraan Hashmi Net Worth: इमरान हाशमी हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये इमरान याची ओळख सिरियल किसर म्हणून होती. पण अभिनेत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि स्वतःच्या अभिनयाचा ठसा उटवला. आजपर्यंत अभिनेत्याने असंख्य सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेता त्याच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, इमरान याच्याकडे तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे.. असं सांगितलं जात आहे… तर अभिनेत्याची संपत्ती जाणून तुमचे देखील डोळे विस्फारतील…

किती आहे इमरान हाशमी याची नेटवर्थ?

इमरान हाशमी यांनी अधिक कमाई सिनेमांच्या माध्यमातून होते. रिपोर्टनुसार, अभिनेत्याची नेटवर्थ 105 कोटी रुपयांपर्यंत आहे… अभिनेत्याने सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे. सिनेमे आणि जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त, इम्रानकडे रिअल इस्टेटचाही एक प्रभावी पोर्टफोलिओ असल्याचे म्हटलं जातं.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचा गोव्यात एक पेंट हाउस आहे, ज्याची किंमक 10 कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर, मुंबईतील वांद्रे परिसरात देखील अभिनेत्याचा आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमक जवळपास 16 कोटी रुपये आहे. शिवाय लोनावळ्यात देखील अभिनेत्याचा एक व्हिला आहे, ज्याची किंमत 12 कोटी रुपये आहे.

अभिनेत्याला महागड्या गाड्यांचा शोक

इमराह हाशमी याच्याकडे महागड्या गाड्या देखील आहे. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत, ज्यामध्ये 3.2 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी हुराकैन, 2.9 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वोग आणि 1.88 कोटींची ऑडी A8L आणि 2.57 कोटी रुपयांची मर्सिडीज मेबॅक यांसरख्या आलिशान गाड्या आहेत.

इमरान हाशमी याचे आगामी सिनेमे

इमरान हाशमी याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘आवारापन 2’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन नितिन कक्कर यांनी केलं आहे. सिनेमात अभिनेत्री दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार असून सिनेमा 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. तर अभिनेता सनी देओल आणि प्रिती झिंटा स्टारर ‘बटवारा 1947’ सिनेमाची कांटे की टक्कर असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us