AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! गायक राहुलला मारायला आलेल्या 5 शार्प शूटरचा एनकाऊंटर, नेमकं काय घडलं? वाचा

गुरुग्राममधील पोलिसांनी चकमकीनंतर गुंड दिपक नांदल आणि रोहित सिरधानियाच्या पाच शार्प शूटर्सना अटक केली आहे. गायक राहुल फाजिलपुरियाच्या हत्येचा कट उधळून लावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

धक्कादायक! गायक राहुलला मारायला आलेल्या 5 शार्प शूटरचा एनकाऊंटर,  नेमकं काय घडलं? वाचा
FazalpuriyaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 27, 2025 | 8:36 AM
Share

हरियाणातील गुरुग्राम जिल्हा पोलिसांनी ५ शार्प शूटर्सचा एन्काऊंटर केला आहे. हे पाचही शूटर्स सिंगर फाजिलपुरियाला मारण्यासाठी आले होते. सांगायचे म्हणजे, सिंगर राहुल यादव उर्फ फाजिलपुरिया यांच्यावर १४ जुलै २०२५ रोजी हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील दक्षिण परिघीय रस्त्यावर (SPR) हल्ला झाला होता, ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. याच प्रकरणात आरोपींचा एन्काऊंटर गुरुग्राममध्ये झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सिंगर राहुल फाजिलपुरियाच्या हत्येचा कट रचणाऱ्या हल्लेखोरांना गुरुग्राम STF ने पकडले आहे. STF आणि क्राइम ब्रांचच्या संयुक्त कारवाईत गुरुग्रामच्या वजीरपूर परिसरात झालेल्या चकमकीनंतर ५ शार्प शूटर्सना अटक करण्यात आली आहे. ४ गुन्हेगारांच्या पायात गोळ्या लागल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका शूटरला पाठलाग करून पकडून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

वाचा: तुझी बायको मला, माझी बायको तुला! छोट्या गावात घाणेरडा खेळ; वाईफ स्वॅपिंगची भानगड आहे तरी काय?

गँगस्टर दीपक नांदलची माणसे

प्राथमिक तपासात असे समजले आहे की, हे पाचही शूटर्स परदेशात बसलेले गँगस्टर दीपक नांदल आणि रोहित सिरधानिया यांच्यासाठी काम करत होते. पाचही शूटर्सची ओळख हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील विनोद पहलवान, सोनीपत जिल्ह्यातील पदम उर्फ राजा, शुभम उर्फ काला, गौतम उर्फ गोगी आणि आशीष उर्फ आशु अशी झाली आहे. यापैकी ४ गुन्हेगारांना पायात गोळ्या मारून पकडण्यात आले आहे, तर एका शूटरला पाठलाग करून पकडले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.