Epstein files : एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचंही नाव ? स्पष्टीकरण देत म्हणाला – मी कधीच..

एपस्टीन फाइल्सने अख्ख्या जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या कथित कागदपत्रांमध्ये बिल क्लिंटन, बिल गेट्स आणि मायकल जॅक्सन सारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्ती तसेच बॉलिवूडमधील व्यक्तींची नावे उघड झाल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकरचही नाव असल्याचं सोशल मीडियावरील एका व्हायरल पेजवर म्हटलं आहे.

Epstein files : एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचंही नाव ? स्पष्टीकरण देत म्हणाला - मी कधीच..
एपस्टीन स्कँडलमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचंही नाव आल्याने खळबळ
Image Credit source: social media
| Updated on: Feb 07, 2026 | 9:01 AM

लैंगिक गुन्हेगार एपस्टिन सेक्स स्कँडलने जगभरात खळबळ उडवली आहे. त्यामुळे अख्खं जग हादरलं आहे. जगभरातील अनेक देशांतील महत्वाच्या व्यक्ती, प्रमुख नेते आणि मोठ्या उद्योजकांचीही नावं या सेक्स स्कँडलध्ये आल्याने एकच खळबळ माजली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सेक्स स्कँडल, याच्याशी निगडीत फाईल्स, त्यातील मजकूर अशा अनेक गोष्टी उघड होत असून त्यातून बरीच धक्कादायक माहितीदेखील समोर येताना दिसत आहे. या कथित कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्टार्ध्यक्ष बिल क्लिंटन, तसेच बिल गेट्स आणि मायकल जॅक्सन यांसारख्या अनेक प्रथितयश व्यक्तींच्या नावाचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला. त्या आंतरराष्ट्रीय चेहऱ्यांसोबतच आता या कथित कागदपत्रांमध्ये बॉलिवूडशी संबंधित नावे देखील समोर येत असल्याचा दाव केला जात आहे. त्यामुळे सगळेच हैराण आहेत.

आता या वादाची तीव्रता बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एपस्टाईन फाइल्सच्या एका पेजमध्ये बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचं या सेक्स स्कँडलमध्ये नाव असल्याचं म्हटलं जात आहे. फिल्मममेकरअनुराग कश्यप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध दिग्दर्शक मीरा नायर यांच्या पतीची नावं यात जोडली गेली असूनत्यामळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ब्लॅक फ्रायडे, देव डी, गँग्स ऑफ वासेपूर यासारखे अनेक उत्तम चित्रपट देमारा अनुराग कश्यप याचं नावही यात समोर आल्याचा दावा केला जात असून त्याने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

व्हायरल झालेल्या या पेजवर अनुराग कश्यपचे वर्णन ‘प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक’ असे केले आहे आणि असा दावा केला आहे की तो एपस्टाईनशी संबंधित काही क्रियांमध्ये सहभागी होता. एवढंच नव्हे तर 2017 साली बीजिंगमध्ये झालेल्या एका कथित कार्यक्रमात तो सहभागी होता, जिथे एपस्टाईनशी संबंधित लोक उपस्थित राहणार होते, असेही यात नमूद करण्यात आलं आहे. या पेजवरील दाव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चा आणि अटकळींना उधाण आलं आहे.

मी कधीच बीजिंगला गेलो नाही

मात्र यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान या एपस्टाईन फाइल्समध्ये केलेल्या कोणत्याही दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी, या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. याच दरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यपने स्वत: समोर येत या र्व चर्चांवर, आरोपांवर उत्तर दिलं आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी कधीच बीजिंगला गेलो नाहीये, त्यामुळे तिथे जाऊन अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्टीकरण अनुरागने दिलं आहे.

” विविध सेमिनार, महोत्सव आणि कार्यक्रमांसाठी वक्ता म्हणून मला जगभरातून आमंत्रणे येत असतात. दर महिन्याला मला जवळपास 15 निमंत्रणं मिळतात, त्यापैकी बहुतांश इन्व्हिटेशन्स मी वाचत देखील नाही, बऱ्याच जणांना उत्तरही देत नाही. फक्त माझे नाव फाईलमध्ये असल्याने मी त्या कार्यक्रमाचा भाग होतो हे सिद्ध होत नाही. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय अशी नावे टाकणे बेजबाबदारपणाचे आहे ” असं म्हणत अनुराग कश्पने उद्वेग व्यक्त केला.

दरम्यान या व्हायरल पेजमध्ये मीरा नायर यांचही नाव आल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे, मात्र त्यांनी त्यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. एपस्टाईन फाइल्सशी संबंधित बरीचशी माहिती अपूर्ण, पुष्टी नसलेली आणि संदर्भाबाहेर सादर केलेली आहे, ज्यामुळे गोंधळ निर्माण होत आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.