
Esha Deol And Ex Husband Bharat Takhtani: घटस्फोटानंतर अभिनेत्री ईशा देओल हिने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ज्यामुळे ईशा देओल चर्चेत आली. तर दुसरीकडे ईशा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे. सध्या ईशा हिचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबई विमानतळावर ईशा हिला पूर्व पती भरत तख्तानी याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. घटस्फोटानंतर ईशा आणि भरत पहिल्यांदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2024 मध्ये दोघांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र आल्यामुळे दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आहे. मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर ईशा हिने पापाराझींना पोज दिल्या तर भरत याने पळ काढला. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फादर्स डेच्या दिवशी ईशा हिने एक कुटुंबाचा फोटो शेअर केला ज्यामध्ये ईशा वडील धर्मेंद्र आणि भरत यांच्यामध्ये बसलेली दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘माझे वडील आणि माझ्या मुलींच्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा..’ अभिनेत्री हा फोटो देखील तुफान व्हायरल झाला.
घटस्फोटानंतर ईशा हिने एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलेला. ‘मी स्वतःला सिंगल मदरच्या रुपात पाहत नाही. कारण मी त्याप्रकारे व्यवहार करत नाही आणि करणार देखील नाही. एवढंच नाही तर, माझ्यासोबत तसं काही होऊ देखील देणार नाही.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. परिस्थिती बदलत असते. जर दोन लोकांमधील नातं चांगलं नसेल, विषेशतः मुलं झाल्यानंतर… तर गरजेचं नाही एकत्र राहिलंच पाहिजे… दोघांनी मिळून नव्या मार्गाचा विचार करायला हवा… म्हणजे मुलांना चांगले संस्कार देता येतील आणि आम्ही तेच करत आहोत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.