ईशा देओलच्या मुलींना नाही माहिती वडिलांनी सोडलीये साथ, अभिनेत्रीसाठी कठीण परिस्थिती

Esha Deol Daughter | ईशा देओल हिच्या मुलींना नाही माहिती आई - वडिलांच्या घटस्फोटाबद्दल, अभिनेत्रीवर ओढावली आहे कठीण परिस्थिती... अखेर ईशाने मौन सोडलंच..., घटस्फोटानंतर ईशा देओल 'सिंगल मदर' म्हणून करतेय दोन मुलींचा साभाळ....

ईशा देओलच्या मुलींना नाही माहिती वडिलांनी सोडलीये साथ, अभिनेत्रीसाठी कठीण परिस्थिती
| Updated on: May 31, 2024 | 9:01 AM

अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशा देओल हिचं लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट झाल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत होती. 2012 मध्ये ईशा देओल आणि उद्योजक भरत तख्तानी यांनी लग्न केलं आहो. पण दोन मुलींच्या जन्मानंतर भरत याने अभिनेत्रीची साथ सोडली. घटस्फोटानंतर ईशा सिंगल मदर म्हणून मुलींचा सांभाळ करत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत ईशा हिने मुलींनी घटस्फोटाची बातमी वाचल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल सांगितलं. ‘माझ्या दोन्ही मुली फार लहान आहेत. मी जेव्हा मोठी होत होती तेव्हा मी देखील न्यूजपेपरमध्ये फार काही वाचलं आहे. मोठी होत असताना मी अनेक गोष्टी वाचल्या आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केले…’

‘आता जेव्हा माझ्या मुली भरत आणि माझ्याबद्दल काही वाचतील तेव्हा मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देईल. ज्यासाठी मी स्वतःला तयार केलं आहे. मला माहिती आहे मला मुलींना काय सांगायचं आहे. पण अद्याप तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे माझ्या मुलींना काहीही माहिती नाही…’ असं देखील ईशा देओल म्हणाली.

सांगायचं झालं तर, ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट चाहत्यांसाठी फार धक्कादायक होता. घटस्फोटापूर्वी देखील अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. ईशा फक्त मुलींसोबत फोटो, व्हिडीओ पोस्ट करत होती. अखेर अनेक दिवसांनतर दोघांनी देखील घटस्फोटाची घोषणा केली.

घटस्फोटानंतर ईशा हिने नव्या आयुष्याला देखील सुरुवात केली आहे. अभिनेत्री अनेक वर्षांनंतर पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. ईशा देओल हिने बॉलिवूडनंतर ओटीटीवर देखील पदार्पण केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत ‘हंटर टूटेगा नही तोडेगा’ या सीरिजमध्ये ईशा दिसली होती. आता देखील नवीन काही तरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

ईशाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2002 मध्ये ‘कोई मेरे दिल से पूछे’ या रोमँटिक सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ईशाने ‘ना तुम जानो ना हम’, ‘क्या दिल ने कहा’, ‘कुछ तो है’, दस’, ‘नो एंट्री’, ‘शादी नंबर 1’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले. पण आई – वडील आणि भावंडांप्रमाणे ईशा हिला प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाली नाही. ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.