AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Esha Deol : ‘ती त्याच लायकीची आहे…’, म्हणून ईशा हिने प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लगावली कानशिलात

Esha Deol : ईशा देओल प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कानशिलात लगावत दाखवली तिची लायकी..., आज 'ती' अभिनेत्री बॉलिवूडपासून आहे दूर..., सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या वक्तव्याची चर्चा... अनेक वर्षांनंतर ईशा देओल हिने सांगितलं तेव्हा नक्की काय झालं होतं?

Esha Deol : 'ती त्याच लायकीची आहे...', म्हणून ईशा हिने प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लगावली कानशिलात
| Updated on: Oct 26, 2023 | 12:39 PM
Share

मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 : अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. नुकताच, ईशा देओल हिच्या ‘एक दुआ’ सिनेमाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आलं. पण ईशा आता तिच्या सिनेमांमुळे नाही, एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र ईशा देओल हिची चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्यारे मोहन’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना ईशा हिने अभिनेत्री अमृता राव हिच्या कानशिलात लागावली होती. ईशा आणि अमृता यांच्यातील वाद अनेक वर्षांनंतर समोर आले आहेत.

२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यारे मोहन’ सिनेमात ईशा देओल, अमृता राव यांच्यासोबत अभिनेता विवेक ओबेरॉय आणि फरदीन खान देखील मुख्य भूमिकेत होते. सिनेमाची शुटींग सुरु असताना ईशा आणि अमृता यांच्यात काही कारणांमुळे वाद झाले होतं. अशात अमृताने ईशा हिच्यासाठी वाईट शब्दांचा वापर केला.

अमृता हिचे शब्द ऐकून ईशा हिच्या भावना दुखावल्या आणि संतापलेल्या ईशा हिने अमृता हिच्या कानशिलात लगावली. मुलाखतीत संबंधीत प्रकरणाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं. ईशा म्हणाली, ‘दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामॅनसमोर अमृताने माझ्याशी गैरवर्तन केले होते. हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटलं. माझा स्वाभिमान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी मी रागावली आणि तिला कानशिलात लगावली.

ईशा पुढे म्हणाली की, तिला कानशिलात मारल्याचा कोणताही पश्चाताप मला होत नाही. कारण, अमृती त्याच लायकीची आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली. घडलेल्या प्रकरणानंतर अमृता हिने ईशा हिची माफी देखील मागितली. अमृता हिने माफी मागितल्यानंतर, ईशाने देखील अमृता हिला माफ केलं आहे. आता दोघींमध्ये देखील चांगले संबंध आहेत.

ईशआ हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘धूम’, ‘अनकही’, ‘इंसान’, ‘कोई मेरे दिल से पूछे’, ‘नो एंट्री’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण ईशा कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.

अमृता राव हिच्याबद्दल सांगायचं झालं, तर ‘विवाह’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. पण त्यानंतर अभिनेत्रीला संधी मिळाली नाही… असं वक्तव्य खुद्द अभिनेत्रीने केलं होतं. सध्या अमृता बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.