ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न झाल्यानंतरही अभिषेक बच्चन विसरू शकला नाही ‘या’ अभिनेत्रीला? थेट मोबाईलवरून मेसेज आणि..

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसली.

ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न झाल्यानंतरही अभिषेक बच्चन विसरू शकला नाही या अभिनेत्रीला? थेट मोबाईलवरून मेसेज आणि..
Aishwarya Rai Abhishek Bachchan
| Updated on: Apr 30, 2024 | 11:53 AM

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले. विशेष म्हणजे यांचे लग्न सर्वाधिक चर्चेत असणारे लग्न ठरले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. मात्र, यावर अजूनही बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ऐश्वर्या राय ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर अभिषेक बच्चन याच्यापेक्षाही जास्त संपत्ती ऐश्वर्या राय हिच्याकडे आहे.

ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अभिषेक बच्चन हा राणी मुखर्जी हिला डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. हेच नाही तर जया बच्चन यांनाही सून म्हणून राणी मुखर्जी पसंद होती. जया बच्चन या बंगाली असल्याने त्यांना राखी मुखर्जीच बच्चन कुटुंबाची सून व्हावी अशी इच्छा होती. अभिषेक बच्चनलाही राणी आवडत असल्याचे सांगितले जाते.

हेच नाही तर ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न झाल्यानंतरही अभिषेक बच्चन याच्या मोबाईलवरून राणी मुखर्जी हिला एक हैराण करणारा मेसेज पाठवण्यात आला होता. ज्यानंतर राणी मुखर्जी हिला देखील मोठा धक्का बसला होता. अभिषेक बच्चन याच्या मोबाईलवरून थेट राणी मुखर्जी हिला मला आजही तुझी खूप आठवण येते, असा मेसेज करण्यात आला.

हा मेसेज पाहून राणी मुखर्जीला धक्काच बसला होता. मात्र, अभिषेक बच्चन याच्या मोबाईलवरून जो मेसेज करण्यात आला होता, तो मेसेज त्याने केला नव्हता. चित्रपटाच्या सेटवर शूटिंगवेळी प्रियांका चोप्रा हिने तो मेसेज अभिषेकच्या मोबाईलवरून राणी मुखर्जीला केला होता. ज्यानंतर प्रियांका चोप्रा हिला पश्चाताप देखील झाला.

याबद्दल खुलासा स्वत: प्रियांका चोप्रा हिने केला. हेच नाही तर प्रियांका चोप्रा म्हणाली की, माझ्यासोबत अभिषेकने सेटवर मोबाईल घेत मजाक केला होता. मग मी ही राणी मुखर्जीला तो मेसेज करत मजाक केला. एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा करताना प्रियांका चोप्रा ही दिसली. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले.