
व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असणारी अभिनेत्री बरीच वर्ष अभिनयापासून दूर होती. पण आता तिने जोरदार कमबॅक केलं आहे.अभिनेत्री माही विज तब्बल 10 वर्षांनी छोट्या पडद्यावर परतली आहे. ती बऱ्याच काळापासून एका चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहत होती. अखेर तिची इच्छा पूर्ण झाली आहे. तिला एक चांगली भूमिका मिळाली आहे.

माही विजने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की लोकांनी तिला नाकारल्यामुळे तिने छोट्या पडद्यावर परतण्याची आशा गमावली होती असं सांगितलं. एवढेच नाही तर काही लोकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिला काम नाकारले. तथापि, अभिनेत्रीने हार मानण्यास नकार दिला आणि कठोर परिश्रम करत राहिली.

माही विजने याबाबत एक पोस्ट केली आणि या पोस्टद्वारे ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे. तिच्या नवीन पोस्टमध्ये माहीने विश्वासाबद्दल बोलले आहे. माहीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की "मी त्या सर्व लोकांची घरे आणि इमारती खरेदी करण्यासाठी येत आहे ज्यांनी माझ्या तोंडावर दार बंद केले होते. विश्वास ठेवा.'

माही विज गेल्या काही काळापासून तिचा पती जय भानुशालीपासून घटस्फोट झाल्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे. तथापि, तिने अधिकृतपणे याबद्दल अद्यापतरी काहीही सांगितलेले नाही. माही विज आणि जय भानुशाली यांना तीन मुले आहेत. त्यांची नावे खुशी, राजवीर आणि तारा आहेत. माही अनेकदा तिच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसते.

माही विज इतकी वर्षे टेलिव्हिजनपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे फोटोशूट, तिच्या अॅक्टीव्हिटीबद्दल प्रेक्षकांसोबत शेअर केलं आहे. या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 2.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.