नेहा कक्कर हिचा संताप, थेट दिले मोठे चॅलेंज, म्हणाली, माझे नावच..

नेहा कक्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नेहा कक्कर ही काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. आता नुकताच नेहा कक्कर ही सुपरस्टार सिंगर 3 मध्ये परतली आहे. नेहा कक्कर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. आता मोठे आव्हान नेहा कक्करने दिले आहे.

नेहा कक्कर हिचा संताप, थेट दिले मोठे चॅलेंज, म्हणाली, माझे नावच..
Neha Kakkar
| Updated on: Jun 09, 2024 | 1:44 PM

नेहा कक्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नेहा कक्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. नेहा कक्कर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. नेहा कक्कर हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे मध्यंतरी सांगितले जात होते. हेच नाही तर नेहा कक्करचा घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता नुकताच नेहा कक्कर हिचा 36 वा वाढदिवस झालाय. खास सेलिब्रेशन नेहा कक्करच्या वाढदिवसाचे सुपरस्टार सिंगर 3 च्या मंचावर करण्यात आले.

विशेष म्हणजे यावेळी नेहा कक्करचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर हा देखील बर्थडे सेलिब्रेशनसाठी पोहचला. टोनी कक्कर याला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त करताना नेहा कक्कर ही दिसलीये. टोनी कक्कर याला सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जातंय. यावर थेट जाहिरपणे बोलताना आता नेहा कक्कर ही दिसली आहे.

नेहा कक्कर म्हणाली की, मिले हो तुमको हमको या गाण्याला 1 बिलियनपेक्षाही जास्त व्यूज आले आहेत. मी त्या लोकांना सांगू इच्छिते, जे टोनी कक्करसारख्या सुप्रीम टॅलेंटला ट्रोल करतात. माझ्या भावाने इतिहास लिहिला आहे. तुम्ही काय केले आहे? टोनी कक्कर याच्यासारखे मिले हो तुमको हमको आणि अरिजित सिंहसारखे सावन आया गायले आहे, तसे तयार करून दाखवा, मी माझे नाव बदलते.

आता थेट टीव्हीवरूनच नेहा कक्कर हिने ट्रोलर्सला थेट मोठे चॅलेज दिले आहे. बहिणीचे बोलणे ऐकून टोनी कक्कर हा खूप जास्त भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले. आता याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. टोनी कक्कर याचे कायमच काैतुक करताना नेहा कक्कर ही दिसते.

नेहा कक्कर हिच्या वाढदिवसाच्या दिवशी रोहनप्रीत सिंह याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. रोहनप्रीत सिंह याची पोस्ट पाहून हे तर स्पष्ट झाले की, रोहनप्रीत सिंह आणि नेहाच्या नात्यात सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे. रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर यांनी एकमेकांना काही दिवस डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.