
अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. दलजीत कौरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दलजीत कौर ही तिच्या अभिनयामुळे नव्हे तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीत कौर हिने गेल्याच वर्षी निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. या लग्नानंतर दलजीत कौर ही केन्याला शिफ्ट झाली. अचानकपणे केन्यावरून भारतामध्ये दलजीत कौर दाखल झाली आणि तेंव्हापासून दलजीत कौर हिच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. यानंतर दलजीत कौर हिने थेट पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले.
दलजीत कौर आणि तिचा पती निखिल पटेल यांच्यातील वाद टोकाला गेलाय. हेच नाही तर दलजीत कौर हिला कायदेशीर नोटीसही निखिल पटेल याने पाठवली आहे. दलजीत कौर ही सोशल मीडियावर सक्रिय असून तिने मंगळसूत्र आणि साखरपुड्याच्या अंगठीचा फोटो शेअर केला होता. आपले दुसरे लग्न वाचवण्याचा प्रयत्न करताना दलजीत कौर दिसली.
निखिल पटेल याच्यासोबतचा वाद टोकाला गेलेला असतानाच दलजीत कौर ही थेट केन्याला गेली. हेच नाही तर केन्यातील काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, केन्यात जाऊनही तिची आणि निखिल पटेलची भेट झाली नाहीये. आता नुकताच दलजीत कौर ही भारतामध्ये परतली आहे. दलजीत कौरचे विमानतळावरील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
दलजीत कौर केन्याहून भारतात आलीये. मात्र, तिच्यामधील आणि निखिल पटेलमधील वाद मिटला नसल्याचे दिसत आहे. दलजीत कौर हिच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होते. दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद मिटला नसल्याचे दिसत आहे. दलजीतला विमानतळावर घेण्यासाठी तिचे वडील पोहचले होते. दलजीत कौर ही तिचे दुसरे लग्न वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे.
दलजीत कौरचे निखिल पटेल याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. दलजीत कौरचे पहिले लग्न अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले. शालिन भनोट आणि दलजीत कौर यांचा एक मुलगा देखील आहे. दलजीत कौर ही निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर आपल्या मुलाला घेऊन विदेशात गेली होती. दलजीत कौर हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.