AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt | काम देता का कोणी काम, चक्क आलिया भट्ट हिने पोस्ट शेअर करत मागितले चित्रपटामध्ये काम, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, करीना कपूरही…

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलिया भट्ट ही पती रणबीर कपूर याच्याबद्दल मोठ्या खुलासा करताना दिसली. ज्यानंतर रणबीर कपूर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. आलियाचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

Alia Bhatt | काम देता का कोणी काम, चक्क आलिया भट्ट हिने पोस्ट शेअर करत मागितले चित्रपटामध्ये काम, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, करीना कपूरही...
| Updated on: Aug 18, 2023 | 10:01 PM
Share

मुंबई : आलिया भट्ट आणि करीना कपूर (Kareena Kapoor) या दोघीही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्री आहेत. काही दिवसांपूर्वीच आता आलिया भट्ट हिचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार अशी कामगिरी ही नक्कीच केलीये. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह (Ranveer Singh) हा देखील मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट हिट ठरलाय. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे दिसले होते.

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला घेऊन करीना कपूर खान हिच्या घरी गेली होती. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. करीना कपूर ही रणबीर कपूर याची चुलत बहीण आहे आणि आता करीना कपूर ही आलियाची ननंद आहे. दोघी अगोदरपासूनच चांगल्या मैत्रिणी देखील आहेत.

आलिया भट्ट आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपट केले आहेत. मात्र, एकदाही एकाच चित्रपटामध्ये काम करताना कधीच आलिया भट्ट आणि करीना कपूर दिसल्या नाहीत. नुकताच आलिया भट्ट हिने एक खास फोटो शेअर केली आहे. या पोस्टसोबतच आलिया भट्ट हिने करीना कपूर हिच्यासोबतचे अत्यंत खास फोटो देखील शेअर केले आहेत.

ही पोस्ट शेअर करताना आलिया भट्ट हिने म्हटले की, कोणी आम्हाला एकसोबत काम देईल का, म्हणजे आम्हाला गप्पा मारता येतील…आता आलिया भट्ट हिने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. काही मिनिटांमध्ये ही पोस्ट चांगलीच व्हायरल झालीये.

आलिया भट्ट हिने शेअर केलेल्या या पोस्टवर करण जोहर याने देखील कमेंट केलीये. आलिया भट्ट आणि करीना कपूर यांनी थेट सोशल मीडियावरच पोस्ट शेअर करत चित्रपटांमध्ये काम मागितल्याने अनेकांनी आर्श्चय देखील व्यक्त केले जात आहे. या पोस्टवर कमेंट करत एकाने म्हटले की, आलिया तू करीना कपूर हिच्यासोबत नको काम करू…

दुसऱ्याने लिहिले की, मुळात म्हणजे आलिया भट्ट हिला चित्रपटामध्ये काम मागण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्याची अजिबातच गरज नव्हती. कारण तिने जर करण जोहरला एक फोन केला असता तर करणने दहा चित्रपटांमध्ये दोघींना एकसोबत घेतले आहे. करण जोहर हा आलिया हिचा चमचाच आहे. ही पोस्ट तूफान व्हायरल होत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?