
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे अनुपम खेर यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अनुपम खेर हे सोशल मीडियावर खास व्हिडीओ (Video) आणि फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. अनुपम खेर हे आपल्या आगामी चित्रपटाचे देखील प्रमोशन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच करतात. काही दिवसांपूर्वीच सतीश काैशिक यांच्या मुलीचा वाढदिवस होता, तिच्या वाढदिवसाबद्दल अनुपम खेर यांनी शुभेच्छा देत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली होती. सतीश काैशिक यांच्या निधनाच्या बातमीची पोस्ट सर्वांत अगोदर अनुपम खेर यांनी शेअर केली होती.
अनुपम खेर हे सतीश काैशिक यांच्या निधनानंतर ढसाढसा रडताना देखील दिसले होते. अनुपम खेर आणि सतीश काैशिक हे दोघे खूप चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी रवींद्रनाथ टागोर या चित्रपटामधील पहिला लूक चाहत्यांसोबत शेअर केला. यानंतर अनेकांनी त्यांचे काैतुक देखील केले होते.
नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा शेअर केला आहे. अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनुपम खेर यांनी चक्क डोक्यावर टॅटू काढलायं. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे.
अनुपम खेर म्हणाले की, माझा हा व्हिडीओ जगभरातील टक्कल असलेल्या लोकांसाठी आहे. ज्या लोकांना डोक्याला केस आहेत, त्यांना वाटते की, ते काहीही करू शकतात. परंतू तुम्ही हे करू शकता? कधीच नाही. आता अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, मला या टॅटूची डिझाईन खूपच जास्त आवडलीये. दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच हा टॅटू खूपच जास्त मस्त तयार करण्यात आलाय. अजून एकाने लिहिले की, मला वाटते की हा टॅटू अनुपम खेर यांनी आगामी चित्रपटासाठी तयार केला आहे.